Kangana Ranaut : वादग्रस्त विधानानंतर खासदार कंगनाची माघार; पक्षाने पुन्हा झापल्यानंतर मागितली माफी

Farm Laws BJP Farmers Protest : तीन वादग्रस्त कृषी कायदे पुन्हा आणायला हवेत, असे विधान कंगना रनौत यांनी केले होते.
Kangana Ranaut
Kangana RanautSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : सातत्याने वादग्रस्त विधाने करून पक्षाला अडचणीत आणणाऱ्या खासदार कंगना रनौत पुन्हा एकदा तोंडावर आपटल्या आहेत. तीन वादग्रस्त कृषी कायदे पुन्हा आणायला हवेत, या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर त्यांना उपरती आली आहे. पक्षाने झापल्यानंतर त्यांनी आपले विधान मागे घेतले आहे.

कंगना रनौत यांनी मंगळवारी तीन कृषी कायदे परत आणण्याबाबत विधान केले होते. हे विधान करताना त्यांनी शेतकऱ्यांनीच त्यासाठी आग्रह धरावा, असेही म्हटले होते. हरियाणा विधानसभेची निवडणूकीची रणधुमाळी सुरू असतानाच कंगना यांचे हे विधान आल्याने पक्षातील नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षानेही त्यांच्या विधानापासून चार हात दूर राहणे पसंत केले.

Kangana Ranaut
Omar Abdullah Vs Rahul Gandhi : मतदानादिवशीच अब्दुल्ला राहुल गांधींवर भडकले; म्हणाले, दुर्दैवाने अपेक्षित..!

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी कंगना यांचे हे वैयक्तिक मत असल्याचे स्पष्ट केले. त्या अशाप्रकारच्या विधानांसाठी अधिकृत नाहीत. आमचे या विधानाला समर्थन नाही, असे भाटिया यांनी म्हटले आहे. त्यानंतर कंगना यांनीही कृषी कायद्यांबाबत आपण पक्षासोबत असल्याचे म्हणत सोशल मीडियात एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. आपले सभ्द मागे घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काय म्हटले आहे कंगनाने?

कंगना यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, मी फक्त एक कलाकार नाही तर भाजपची कार्यकर्ताही असल्याचे मला लक्षात ठेवायला हवे. माझी मते वैयक्तिक राहू शकत नाहीत. मला खेद वाटतो. मी माझे शब्द मागे घेत आहे.

Kangana Ranaut
Vinesh Phogat : विनेश फोगट यांनी सांगितले राजकारणात येण्याचे कारण

दरम्यान, कंगना यांच्या विधानावर काँग्रेस, आपसह इतर विरोधी पक्षांनी भाजपवर टीका केली होती. तसेच भाजपमधील काही नेत्यांनीही कंगना यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे कंगनाने कायदे परत आणण्याबाबत केलेल्या विधानानंतर यावरून वाद निर्माण होईल, असे टिपण्णीही केली होती. वाद होणार हे माहित असूनही त्यांनी जाणीवपूर्वक हे वक्तव्य केले होते, हे स्पष्टच आहे. यापूर्वी पक्षाने अशा विधानांपासून लांब राहण्याबाबत कंगना यांना तंबी दिली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com