माजी केंद्रीय मंत्र्यांचा भाजपला रामराम..खासदारकीही सोडणार

माजी केंद्रीय मंत्री मनसुख वसावा यांनी भाजपला रामराम केला आहे. त्यांनी खासदारकीचाही राजीनामा देण्याचे जाहीर केले आहे.
bjp mp masukh vasava resigns from party over tribal development issue
bjp mp masukh vasava resigns from party over tribal development issue
Published on
Updated on

भरूच : गुजरातमधील भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनसुख वसावा यांनी आज पक्षाला रामराम केला. संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये खासदारकीचा राजीनामा देणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले आहे. सहा वेळा खासदार असलेल्या वसावा यांच्या राजीनाम्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. 

वसावा यांनी आदिवासी विकासाच्या मुद्यावरून भाजपला अनेक वेळा घरचा आहेर दिला आहे. वसावा यांनी मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात नर्मदा जिल्ह्यातील १२१ गावांना पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील घोषित करणारी पर्यावरण आणि वन मंत्रालयाची अधिसूचना मागे घ्यावी, अशी मागणी केली होती. 

वसावा यांनी सहा वेळा भरूच लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. वसावा यांनी राजीनाम्याचे पत्र २३ डिसेंबरला गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवले होते. या पत्रात वसावा यांनी म्हटले आहे की, माझ्या चुकांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये, असे मला वाटते, त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे. आतापर्यंत मी भाजपशी प्रामाणिक राहिलो मला माफ करावे. 

संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात मी लोकसभाध्यक्षांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सोपवणार आहोत. माझा हा संदेश पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पोचविण्यात यावा, असेही वसावा यांनी स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, वसावा यांचा राजीनामा हा दबावतंत्राचा भाग असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण त्यांनी उपस्थित केलेल्या अनेक विषयांना पक्ष गंभीरपणे घेत नसल्याचे दिसत आहेत. याचबरोबर राज्यातील भाजप पदाधिकाऱ्यांबद्दल वसावा नाराज असून, ते राज्यातील नेत्यांवर जाहीरपणे टीका करीत आहेत. पक्षाने आपले म्हणणे ऐकावे यासाठीच वसावा यांनी हे पाऊल उचचले असण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com