भाजप खासदाराच्या मुलाचा पक्षाला रामराम अन् घराणेशाहीवरून थेट केंद्रीय मंत्र्यांवर निशाणा

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या म्हणजे सातव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावण्याआधीच भाजपला मोठा धक्का बसला आहे.
Mayank Joshi
Mayank JoshiSarkarnama

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) शेवटच्या म्हणजे सातव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावण्याआधीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. खासदार रीटा बहुगुणा जोशी (Rita Bahuguna Joshi) यांचे पुत्र मयांक जोशी (Mayank Joshi) यांनी शनिवारी समाजवादी पक्षात प्रवेश केला. मयांक जोशी यांनी 22 फेब्रुवारी रोजीच सपाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची भेट घेतली होती. त्यानंतर बारा दिवसांतच प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी अखिलेश यांना साथ देत भाजपचे टेन्शन वाढवले.

विधानसभेचे तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या मयांक यांनी 22 फेब्रुवारी रोजी अखिलेश यांची भेट घेतली होती. या भेटीवरून राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. मयांक हे सपामध्ये प्रवेश करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर या भेटीनंतर शनिवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले. आझमगड येथील प्रचारसभेत अखिलेश यांनीच याबाबत अधिकृत घोषणा केली. समाजवादी पक्षाने या दोघांचा सभेतील फोटो ट्विट करत ही माहिती दिली. (UP Election Update)

Mayank Joshi
पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात अजित पवारच भाव खाऊन गेले!

रीटा बहुगुणा यांनी मुलाला तिकीट मिळावे यासाठी जाहीरपणे खासदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. तरीही पक्षाने त्यांच्या मुलाचे तिकीट कापून जोशींना धक्का दिला आहे. यामुळे जोशी या नाराज आहेत. आतापर्यंत निवडणुकीच्या प्रचारातही फारशा दिसल्या नाहीत. अखिलेश यांच्या भेटीनंतर मयांक म्हणाले होते की, ही एक शिष्टाचार म्हणून भेट होती. पण जिथे माझा उपयोग होईल किंवा कोणी मला बोलवेल तिथे मी जाईन. जर कुणी बोलावलं नाही तर मी घरी बसून आराम करेन, असं सुचक वक्तव्य त्यांनी केलं होतं.

सपामध्ये प्रवेश केल्यानंतर मयांक यांनी भाजपच्या (BJP) घराणेशाहीच्या भूमिकेवरच टीका केली. ते म्हणाले, भाजपमध्ये घराणेशाहीबाबतची भूमिका म्हणजे एक फसवणूक आहे. मी आजपर्यंत विचार करतोय की नेमकं याचा निकष काय आहे. कशाच्या आधारावर राजनाथसिंह यांच्या मुलाला तिकीट दिले जाते. पण रीटा बहुगुणा यांच्या मुलाला तिकीट मिळत नाही. या नेत्यांबाबत हे निकष का लागू होत नाहीत, असा सवाल मयांक यांनी केला.

Mayank Joshi
...अन् फडणवीसांनी अजितदादांना पंतप्रधान मोदींच्या शेजारी उभं केलं!

मी तेरा वर्ष पक्षात काम करत होतो. पण पक्षाने मला काहीच दिलं नाही. बरं झालं मला तिकीटही दिलं नाही. आता मी समाजवादी पक्षात येऊन खुश आहे. समाजवादी पक्षातच युवकांचे भविष्य आहे, असंही मयांक म्हणाले. दरम्यान, मयांक यांना लखनौ कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून उमेदवारी हवी होती. लखनऊ कॅन्टोन्मेंट मतदारसंघात मोठ्या संख्येने ब्राम्हण मतदार आहेत. त्यापैकी अनेकजण उत्तराखंडचे आहेत. रीटा बहुगुणा जोशी या मतदारसंघात दोनवेळा आमदार होत्या. या मतदारसंघासह पाचव्या टप्प्यातील प्रयागराज जिल्ह्यातील जागांवरही रीटा बहुगुणा यांचा प्रभाव असल्याचे मानले जाते. त्या प्रयागराजच्या पहिल्या महापौर होत्या. आता याच मतदारसंघाच्या त्या खासदार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com