...अन् फडणवीसांनी अजितदादांना पंतप्रधान मोदींच्या शेजारी उभं केलं!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हिरवा झेंडा दाखवत पुणे मेट्रोचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी गरवारे कॉलेज ते आनंदनगर असा पाच किलोमीटरचा प्रवासही केला.
PM Narendra Modi inaugurated the Pune Metro Project
PM Narendra Modi inaugurated the Pune Metro ProjectTwitter/@ANI
Published on
Updated on

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी हिरवा झेंडा दाखवत पुणे मेट्रोचे (Pune Metro) उद्घाटन केले. यावेळी त्यांनी गरवारे कॉलेज ते आनंदनगर असा पाच किलोमीटरचा प्रवासही केला. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेही उपस्थित होते. मेट्रो स्थानकाचे उदघाटन होत असताना फडणवीस हे अजितदादा आणि शिंदे यांची विशेष काळजी घेताना दिसून आले.

नरेंद्र मोदी यांच्या यांनी बटन दाबून मेट्रोची सुरूवात केली. यावेळी सुरूवातीला त्यांच्या शेजारी फडणवीस उभे होते. पण मागून अजित पवार आणि एकनाथ शिंदे आल्याचे पाहताच फडणवीस यांनी पवारांना मोदींच्या शेजारी उभे केले. तर शिंदे यांनाही दादांच्या शेजारी जागा देऊन ते बाजूला उभे राहिले. उद्घाटनावेळीही दोघांचाही मान ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत होते.

PM Narendra Modi inaugurated the Pune Metro Project
PM मोदींचे विमान पुण्यात उतण्यापूर्वीच महापौर मोहोळांवर ओढावली नामुष्की

पुणे दौऱ्यातील मुख्य कार्यक्रमातही अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे नेते शेजारी बसले होते. अधूनमधून दोघांमध्ये चर्चाही होत होती. महाविकास आघाडी सत्तेत येण्यापूर्वी फडणवीस आणि पवारांचा पहाटेचा शपथविधी बराच गाजला होता. या शपथविधीमुळे राज्याच्या राजकारणात मोठा स्फोट झाला होता. पण त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या अन् आघाडी सत्तेत आली. सध्या राज्यात महाविकास आघाडीविरूध्द भाजप असा जोरदार संघर्ष सुरू आहे. त्यातच हा कार्यक्रम होत असल्याने भाजपने जोरदार तयारी केली आहे. पण फडणवीस यांनी पवार, शिंदेंची विशेष काळजी घेतल्यानं त्याचीही चर्चा रंगली आहे.

पुणेकरांना सोमवारपासून करता येणार प्रवास

मोदींच्या हस्ते या मेट्रो मार्गांचे उद्घाटन झाल्यानंतर सोमवारपासून (७ मार्चपासून) या मार्गांवरील मेट्रो प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यातील वनाझ ते रामवाडी हा 13 किलोमीटरचा मार्गा असून त्यापैकी वनाझ ते गरवारे हा पाच किलोमीटरचा मेट्रो मार्गाचे काम पुर्ण झाले आहे. तर पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा दूसरा मार्ग आहे. हा 12 किलोमीटरचा मार्ग असून त्यापैकी पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या सात किलोमीटर मार्गाचे कामही तयार झालं आहे. या दोन मेट्रो मार्गांचे मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर उद्यापासून हा मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी उपलब्ध होत आहे.

सकाळी आठ ते रात्री नऊ पर्यंत प्रवाशांना मेट्रोने प्रवास करता येईल. पुणे शहरात वनाझ ते रामवाडी दरम्यान मेट्रोने प्रवास करण्यासाठी पहिल्या तीन स्टेशनसाठी दहा रुपये तर पुढच्या दोन स्टेशनपर्यंत देखील प्रवास करायचा असेल तर आणखी दहा रुपये इतकी तिकीटाची रक्कम आहे. म्हणजे वनाझ ते गरवारे स्टेशनपर्यंत प्रवास करण्यासाठी वीस रुपये मोजावे लागणार आहेत. तर पिंपरी- ते फुगेवाडी हा सात किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी वीस रुपयांचे तिकीट असेल. सध्या या दोन्ही मेट्रो तीन डब्यांच्या आहेत. प्रत्येक डब्याची 325 प्रवासी क्षमता आहे. तीनपैकी एक डबा महिलांसाठी राखीव असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com