Rajnath Singh, Narendra Modi, Amit Shah
Rajnath Singh, Narendra Modi, Amit ShahSarkarnama

BJP President News : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची तारीख ठरली; खुद्द मोदी, शाह असणार प्रस्तावक... 'हा' नेता आघाडीवर...

BJP national president election : नितीन नबीन हे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यास ते आतापर्यंतचे सर्वाधिक तरूण अध्यक्ष असतील. त्यांचा कार्यकाळ जानेवारी २०२९ पर्यंत असेल.
Published on

BJP organisational news : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच बिहारमधील आमदार नितीन नबीन यांच्या खांद्यावर कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यानंतर आता राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीला वेग आला आहे. निवडणुकीच्या तारखाही निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा हे सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे. मात्र, त्यांची मुदत लोकसभा निवडणुकीआधीच संपली आहे. त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पक्षाने नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठी १९-२० जानेवारी या तारखा निश्चित केल्याचे समजते. १९ जानेवारीला उमेदवारी अर्ज दाखल करणे आणि २० जानेवारीला मतदान होईल.

पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांचीच दावेदारी सर्वाधिक मजबूत असल्याचे मानले जात आहे. या निवडणुकीसाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह पक्षसंघटनेतील दहा नेते प्रस्तावक असतील.

Rajnath Singh, Narendra Modi, Amit Shah
ZP, पंचायत समित्यांच्या निवडणुकीबाबत सर्वात मोठी अपडेट; तिढा सुटताच मतदान, निकालाचा दिवस ठरला...

दरम्यान, नितीन नबीन हे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यास ते आतापर्यंतचे सर्वाधिक तरूण अध्यक्ष असतील. त्यांचा कार्यकाळ जानेवारी २०२९ पर्यंत असेल. याचवर्षी लोकसभेची निवडणूक आहे. त्यामुळे नबीन यांचा कार्यकाळ वाढविला जाऊ सकतो. नड्डा यांचाही कार्यकाळा यापूर्वी असाच वाढविण्यात आला होता.

नड्डा यांनी २०२० मध्ये अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली होती. त्यानंतर २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीमुळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. त्यांना अध्यक्ष होण्यापूर्वी स्थायी अध्यक्ष बनविण्यात आले होते. त्यामुळेच नबीन यांचे सध्या पारडे जड असल्याचे सांगितले जात आहे.

Rajnath Singh, Narendra Modi, Amit Shah
Sangram Patil Case : संग्राम पाटील प्रकरण महागात पडणार? थेट ब्रिटनने घेतली दखल, मिळणार पाठबळ...

नबीन हे ४५ वर्षांचे असून त्यांना पक्षसंघटनेचा मोठा अनुभव आहे. ते पाचवेळा आमदार बनले आहेत. बिहार सरकारमध्ये सध्या ते रस्ते निर्माण मंत्री आहेत. त्यांचे वडील नवीन किशोर सिन्हा हे भाजपचे मोठे नेते होते. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत नबीन यांनीही राजकारणात वाटचाल केली. बांकीपूर या विधानसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात.      

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com