BJP President News: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अचानक महाराष्ट्रातून 'हे' मोठं नाव आलं चर्चेत; 'RSS' आपली 'ती' इच्छा पूर्ण करणार?

BJP National President 2025 : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर आता दिल्लीत भाजपच्या गोटात राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी खलबतं सुरू झाली आहे. जेपी नड्डा यांच्या उत्तराधिकारी आणि भाजपचा नव्या अध्यक्षांची या महिन्याच्या अखेरीस घोषणा होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे.
Modi- Shah- Nadda
Modi- Shah- Nadda Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi: भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. पितृपक्ष संपल्यानंतर भारतीय जनता पक्षाला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसह महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी सत्ताधारी भाजप(BJP) पक्षाला नवा अध्यक्ष मिळण्याची दाट शक्यता आहे.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर आता दिल्लीत भाजपच्या गोटात राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी खलबतं सुरू झाली आहे. जेपी नड्डा यांचा उत्तराधिकारी आणि भाजपच्या नव्या अध्यक्षांची या महिन्याच्या अखेरीस घोषणा होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे.

'एनबीटी ऑनलाईन'ला दिलेल्या माहितीनुसार व भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निकटवर्तीयांसह खात्रीशीर सूत्रांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. उपराष्ट्रपतीपदी एनडीएच्या सीपी राधाकृष्णन यांचा विजय झाल्यानंतर आता राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीची जुळवाजुळव सुरू झाली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या काही दिवसांत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या किमान दोनदा बैठका झाल्या आहेत. त्यातील घडामोडी पाहता आता राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातून एक धक्कादायक नाव चर्चेत आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या अध्यक्षपद ठरवण्यात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Modi- Shah- Nadda
Dhananjay Munde-Bajrang Sonawane : बीडची रेल्वे धावली अन् नेते रुळावर! धनुभाऊ- बजरंग बप्पा अन् अजितदादा गप्पात रंगले!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या नावावर दिल्लीसह नागपूरातही बराच खल सुरू असल्याची अपडेट आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील प्रचंड मोठ्या यशानंतर फडणवीस यांच्याकडेच अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि भाजपमधील संघटनात्मक नेतृत्व तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ब्राह्मण चेहरा दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात फडणवीस यांच्यासह विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा, तसेच उत्तर प्रदेशचे राज्यसभेचे खासदार दिनेश शर्मा यांच्याही नावाचा समावेश आहे.

Modi- Shah- Nadda
Dhananjay Munde News: मार्च महिन्यात मंत्रिपदाचा राजीनामा; धनंजय मुंडे सरकारी बंंगला केव्हा सोडणार? मोठी अपडेट समोर

देवेंद्र फडणवीस स्वतः संघाचे स्वयंसेवक राहिले आहे. नेहमीच त्यांनी राजकीय आचरणातही संघाच्या शिस्तीचे पालन केले आहे. राजकीय नफ्या तोट्यासाठी त्यांनी कधीही स्वतः संघाचा स्वयसेवक असल्याचे लपवले नाही. फडणवीस हे नागपूरचे असल्याने संघाच्या सर्वच पातळ्यांवर त्यांचा थेट डायलॉग नेहमीच राहिला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या जोरदार झटक्यानंतर विधानसभा निवडणुकीत संघाने भाजपसाठी जोरदार प्रयत्न केले. त्यासाठीच्या समन्वयाच्या महत्त्वाच्या पातळ्यांवर देवेंद्र फडणवीस हेच संघाच्या संपर्कात होते. भाजपला गेले पाच वर्ष महाराष्ट्रात एक संघ ठेवण्यामध्ये फडणवीसांची भूमिका राहिली असून पुढेही भाजपची सारख्या वैचारिक दिशेत वाटचाल घडवण्याची क्षमता फडणवीस यांच्यामध्येच आहे हे संघाला पुरतं माहित आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com