BJP Election : भाजपला नवे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष कधी मिळणार? महत्वाची अपडेट आली समोर

JP Nadda BJP Organisational Election BJP political updates BJP Maharashtra news : भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीबाबतचा आढावा घेण्यासाठी रविवारी दिल्लीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
Narendra Modi, Amit Shah
Narendra Modi, Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : मागील काही महिन्यांपासून भाजपचे विविध राज्यांतील प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याबाबत अनेकांच्या नावांवर चर्चा झडत आहेत. पण असे असले तरी ही निवड कधी होणार, याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे. आता नवीन वर्षातच भाजपला अध्यक्ष मिळणार हे स्पष्ट आहे.

दिल्लीत रविवारी भाजपच्या अंतर्गत निवडणुकांबाबत आढावा घेण्यासाठी पक्षाच्या मुख्यालयात बैठक होत आहे. या बैठकीत सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डी, संघटना महासचिव बी. एल. संतोष, राष्ट्रीय सरचिटणीस, सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, सरचिटणीस आणि संघटनात्मक निवडणूक प्रभारी, सहप्रभारी आदी पदाधिकारी उपस्थित असल्याचे समजते.

Narendra Modi, Amit Shah
Sharmishtha Mukherjee : 'माझ्या बाबांच्या निधनानंतर साधं..!', प्रणव मुखर्जींच्या मुलीनं व्यक्त केली काँग्रेसवर नाराजी

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. त्यानुसार, बैठकीमध्ये मंडल, जिल्हा आणि राज्य पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीवर भर दिला जाणार आहे. राज्यांमधील निवडणुकांची प्रक्रिया 50 टक्के पूर्ण झाल्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्षंच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया 15 जानेवारीनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. देशातील 50 टक्के राज्यांतील निवडणुका 15 जानेवारीपर्यंत पूर्ण होऊ शकतात.

महाराष्ट्रालाही मिळणार नवे प्रदेशाध्यक्ष

महाराष्ट्रालाही नवे प्रदेशाध्यक्ष लवकर मिळू शकतात. सध्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे हे आता कॅबिनेट मंत्री झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपद काढून घेतले जाणार, हे स्पष्ट आहे. माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांचे नाव या रेसमध्ये आघाडीवर असल्याची चर्चा आहे. पुढील 15 ते 20 दिवसांत भाजपला नवे अध्यक्ष मिळू सकतात.

Narendra Modi, Amit Shah
Year Ender 2024 सरत्या वर्षात कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेची, राममंदिराची स्वप्नपूर्ती

दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात आरएसएस पदाधिकाऱ्यांचीही बैठक जाल्याचे एएनआयच्या वृत्तात म्हटले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान आरएसएस आणि भाजपमध्ये समन्वय राखण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com