BJP News : Devendra Fadnavis News :
BJP News : Devendra Fadnavis News : Sarkarnama

BJP News : भाजप सीमावासीयांच्या पाठिशी, राऊत काँग्रेसच्या दलालीसाठी आले; फडणवीसांची बोचरी टीका !

Devendra Fadnavis News : "भाजप सीमावासीयांच्या पाठिशी ठामपणे उभी.."
Published on

Sanjay Raut News : कर्नाटक राज्यात सद्या विधानसभा निवडणुकांची लगबग सुरू आहे. काँग्रेस, भाजपसह जेडीएसने इथे आपली प्रतिष्ठा पणाला लावत, निवडणुकीत प्रचार करताना दिसत आहेत. सीमाभागातील बेळगावात आणि एकूणच एकूण कर्नाटक राज्यात सगळीकडे कमळच फुललेले दिसेल. मागील 9 वर्षांमध्ये देशात परिवर्तन झाले आहे, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हंटले आहे. ते कर्नाटकातील भाजपच्या प्रचार सभेत बोलत होते.

भाजप मराठी भाषिकांच्या पाठीशी :

भारतीय जनता पक्ष हा एक राष्ट्रीय पक्ष आहे. याआधीही बेळगावात मी आलो आहे. दिवंगत विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी कर्नाटकात प्रभारीचं कामही केलं होतं. तेही पक्षासाठी सीमाभागात फिरत होते. मी स्वत: सीमाभागातील मराठी भाषकांच्या बाजूने मागे उभा आहे. आमचा भाजप पक्ष देखील सीमावासीयांच्या बाजूने ठामपणे उभा आहे, असे फडणवीस म्हणाले.

BJP News : Devendra Fadnavis News :
Dhule APMC Politics: काँग्रेसने भाजप खासदार सुभाष भामरेंचा करेक्ट कार्यक्रम केला!

'राऊत काँग्रेसची दलाली करण्यासाठी आले होते'

संजय राऊत हे काँग्रेसची दलाली करायचे सोडलं तर मला इथे कर्नाटकात जाण्याची आवश्यकता पडणार नाही. संजय राऊत यांचा काँग्रेस हा मित्रपक्ष आहे. मात्र राऊतांनी आपल्या मित्रपक्ष काँग्रेसला प्रचार कुठे करावा आणि कुठे करु नये, याबाबत काही सल्ले दिले नाही. कारण ते फक्त काँग्रेसची दलाली करण्यासाठीच आले आहेत, अशी बोचरी टीका फडणवीसांनी केली

BJP News : Devendra Fadnavis News :
A highly educated leader in Maharashtra politics : महाराष्ट्राच्या राजकारणातील उच्चशिक्षित नेते

'कर्नाटकात काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार नाही -

विरोधी पक्षांनी फक्त राजकारण केलं. विरोधकांच्या सरकारांनी मोदीजींच्या योजना, सामान्य लोकांपर्यंत पोहचू दिल्या नाहीत. कर्नाटकामध्ये काँग्रेस मुख्यमंत्री होणे शक्य नाही. काँग्रेस पक्षातच मुख्यमंत्रीपदासाठी भांडणं लागली आहेत, असे ही फडणवीस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com