BJP News : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपचे पुन्हा धक्कातंत्र? दोन-चार दिवसांत मुख्यमंत्र्यांची नावे होणार जाहीर

Who Is Rajasthan Madhya Pradesh And Chhattisgarh New CM : भाजप येत्या दोन--चार दिवसांत तीन राज्यांतील मुख्यमंत्र्याची नावे जाहीर करणार...
Bjp news
Bjp newsSarkarnama

Bjp Politics : विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी लागले. निकाल लागून तीन दिवस उलटले. पण भाजपने अजूनही राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदासाठीच्या चेहऱ्यांची नावे जाहीर केलेली नाहीत. मात्र मुख्यमंत्र्यांची नावे निश्चित झाल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. यामुळे मुख्यमंत्री कोण होणार? याची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Bjp news
Baba Balaknath : कोण आहेत 'बाबा बालकनाथ'? राजस्थानचे भावी मुख्यमंत्री म्हणून सुरू आहे जोरदार चर्चा!

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीनही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची नावे निश्चित झाल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीनही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची नावे निश्चित केल्याचे बोलले जात आहे. ही नावे पुढील दोन ते चार दिवसांत भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा हे जाहीर करतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

अनुभवी, नवीन आणि तरुण चेहरा याचा मेळ भावी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये दिसावा, अशी रचना केली असल्याचे बोलले जात आहे. यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजप गुजरात पॅटर्न वापरून पुन्हा धक्कातंत्राचा वापर करणार, अशी चिन्हे आहेत. गुजरातमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने अचानक भूपेंद्र पटेल यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करून धक्का दिला होता. विजय रुपानी यांना हटवून भाजपने पटेल यांचे नाव जाहीर केले होते. महाराष्ट्रातही सत्ता बदल झाल्यानंतर भाजप नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करून धक्का दिला होता. आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली.

अनुभवी, नवीन आणि तरुण चेहरा हे तीन निकष पाहता राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार असलेल्या वसुंधरा राजे, मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान आणि छत्तीसगडमध्ये रमन सिंह या स्पर्धेत असलेल्या नेत्यांचे काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. पण २०२४ च्या लोकसभा निवडणुका पाहता प्रस्थापितांना डावलूनही चालणार नाही. याची जाणीव पंतप्रधान मोदी आणि शहांना असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

विधानसभा निवडणुकांमध्ये आदिवासी, ओबीसी, महिला आणि तरुण मतदारांनी भाजपला भक्कम साथ दिली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये आदिवासी मतदारसंघांमध्ये भाजपचा मोठा विजय झाला आहे. मध्य प्रदेशात २४, छत्तीसगडमध्ये १७ आणि राजस्थानमध्ये १२ आदिवासी मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार जिंकले आहेत. यामुळे हे मुद्दे लक्षात घेऊनच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाचे चेहरे निवडले जातील, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Bjp news
BJP Politics News : सत्ता मिळवली, पण आता भाजपची अग्निपरीक्षा ; मुख्यमंत्रिपदांचा तिढा कधी सुटणार ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com