Baba Balaknath : कोण आहेत 'बाबा बालकनाथ'? राजस्थानचे भावी मुख्यमंत्री म्हणून सुरू आहे जोरदार चर्चा!

Rajasthan Assembly Elections Results : जाणून घ्या, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी नेमका काय आहे संबंध?
Baba Balaknath
Baba BalaknathSarkarnama
Published on
Updated on

Rajasthan News : दोन दिवसांपूर्वी देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. ज्यामध्ये तीन राज्यात भाजपाने विजय मिळवला तर काँग्रेसने एका राज्यात सत्ता काबिज केली. मात्र याचबरोबर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला आपली सत्ता गमवावी लागली.

राजस्थान सारख्या राज्यात काँग्रेसला भाजपाने जोरदार टक्कर देत, गेहलोत सरकारला सत्तेतून खाली खेचलं. निवडणूक निकालानंतर आता भाजप या ठिकाणी सरकार स्थापन करणार आहे. मात्र तत्पूर्वी राजस्थानमध्ये भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

कारण मुख्यमंत्री पदासाठी वसुंधरा राजे यांच्यासह अन्य काही नावं चर्चेत असताना, एका नावाने या शर्यतीत आघाडी घेतली आणि आता राजस्थानचे भावी मुख्यमंत्री तेच ठरणार असल्याचंही सांगितलं जात आहे. ते व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून महंत बालकनाथ आहेत. ज्यांच्या नावाची सध्या देशभर चर्चा सुरू आहे आणि सर्वांनाच त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Baba Balaknath
Ishwar Sahu News : मजूर असलेल्या ईश्वर साहूंनी सातवेळा आमदार झालेल्या काँग्रेस उमेदवारास केलं पराभूत!

नेमके कोण आहेत बाबा बालकनाथ? -

खरंतर या निवडणुकीअगोदर देशपातळीवर महंत बालकनाथ यांचं नाव कधी चर्चेत आलं नव्हतं. परंतु आता त्यांच्याकडे राजस्थानचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जात आहे. राजस्थानमध्ये बाबा बालकनाथ या नावाने त्यांना ओळखले जात असले तरी सध्या त्यांची तुलना ही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी केली जात आहे.

कारण बालकनाथ आणि योगी आदित्यनाथ हे दोघेही नाथ संप्रदायातून आलेले आहेत. शिवाय या दोघांचाही पेहराव सारखाच आहे. दोघेही भगवी वस्त्र परिधान करतात.

राजस्थानातील अलवर जिल्ह्यातील कोहराना गावात 16 एप्रिल 1984 रोजी बालकनाथ यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेले बालकनाथ यांचे संपूर्ण कुटुंब लोककल्याण आणि संतांच्या सेवेत होते. वयाच्या 6 व्या वर्षीच त्यांनी अध्यात्माचा अभ्यास केला. गुरूंकडून दीक्षा घेतल्यानंतर त्यांना महंत चंद नाथ यांच्याकडे पाठवण्यात आले. इकडे त्यांना बालकनाथ हे नाव पडले. 29 जुलै 2016 रोजी महंत चंद नाथ यांनी बालकनाथ यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली. आणि ते मठाचे आठवे महंत झाले.

Baba Balaknath
Telangana News : भाजप आधी काँग्रेसची बाजी! तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटला, रेवंथ रेड्डींच्या नावाची घोषणा

याशिवाय महंत बालकनाथ हे भाजपचे फायरब्रँड नेते आहेत. भाजपच्या हिंदुत्वाशी अगदी मिळता जुळता चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. निवडणूक लढवण्या अगोदर ते लोकसभेत खासदारही होते. तरी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. अलवर जिल्हा हा बालकनाथ यांचा बालेकिल्ला असून, अलवरच्या आसपासच्या भागात त्यांची मजबूत पकड आहे. राजस्थानच्या तिजारा विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले आहेत.

भाजपने त्यांना खास हेतूने विधानसभा निवडणुकीत उतरवले असल्याचे दिसते. त्यामुळे ते सध्या राज्यात मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदारही मानले जात आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com