BJP President : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित, संघाने देखील दिला ग्रीन सिग्नल, तारीख ठरली!

Dharmendra Pradhan BJP Politics : पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष देण्यासाठी राज्य शाखांची मतदान प्रक्रिया पूर्ण करून नवीन अध्याचे नाव पुढील काही आठवड्यात जाहीर करण्याची शक्यता आहे.
BJP Pune
BJP PuneSarkarnama
Published on
Updated on

BJP President News : लोकसभा निवडणुकीनंतर भाजप राष्ट्रीय अध्यक्षाच्या प्रतीक्षेत होता. जे.पी.नड्डा हे केंद्र सरकारमध्ये मंत्री झाल्याने त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार याची उत्सुकता होती. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर तब्बल एक वर्ष भाजपला पूर्ण वेळ अध्यक्ष नाही. प्रभारी अध्यक्ष म्हणून मंत्री जे पी नड्डा यांच्याकडे कार्यभार आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये अध्यक्षपदाबाबत एकमत होत नसल्याने अध्यक्षपदाची नियुक्ती लांबणीवर पडल्याची देखील चर्चा होती.

अध्यक्षपदासाठी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय ऊर्जा व नगरविकासमंत्री मनोहरलाल खट्टर तसेच धर्मेंद्र प्रधान यांच्या नावावर चर्चा सुरु होती. यातील धर्मेंद्र प्रधान यांच्या नावाला संघाने ग्रीन सिग्नल दिल्याचे सुत्रांच्या अहवालने वृत्त एका मराठी वर्तमानपत्राने दिले आहे. विशेष म्हणजे संसदेच्या पावसाळी अधिवेशानापूर्वी म्हणजे 21 जुलैपूर्वीच या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

बिहार विधानसभा निवडणूक आणि महाराष्ट्रातील मुंबई महापालिकेची निवडणूक ही भाजपच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळेच पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष देण्यासाठी राज्य शाखांची मतदान प्रक्रिया पूर्ण करून प्रधान यांचे नाव जाहीर करण्याची शक्यता आहे. मुळचे ओडिसा येथील असलेले प्रधान जर अध्यक्ष झाले तर पूर्वकडील राज्याला अध्यक्षपद देण्याची भाजपमध्ये पहिलेच वेळ असेल.

BJP Pune
Raj-Uddhav Thackeray: ठाकरे बंधुंच्यासमोर सरकार झुकले; रणनीतीतील बदल की जनभावनेचा स्वीकार?

पूर्व-दक्षिण संतुलनाचा प्रयत्न

ओडिशामध्ये भाजपचे पहिल्यांदाच सरकार आले आहे.पूर्वकडे भाजपने आपला चांगला विस्तर केला आहे. उत्तरेकडील राज्यांचा भाजपला मोठा पाठींबा आहे. मात्र दक्षिणेत कर्नाटक वगळता भाजपला कोठेही मोठे यश मिळालेले नाही. त्यामुळे उत्तरेत वर्चस्व निर्माण करणाऱ्या भाजपला पूर्व आणि दक्षिण भारतात पक्षाअंतर्गत सत्ता वाटप करताना संतुलन ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

नवीन अध्यक्षांच्या नेतृत्वात लोकसभा

नवीन अध्यक्षाच्या नेतृत्वात 2029 मधील लोकसभा निवडणूक लढली जाणार आहे. त्यापूर्वी नवीन अध्यक्षांना पुढील 15 ते 20 महिन्यात सात ते नऊ राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीला समोरे जावे लागेल. त्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेनंतर जी पिछेहाट झाली होती तेथे पुन्हा पक्षाला सत्तेवर आणण्याची मोठी जबाबदारी मुख्यमंत्री योगी यांच्यासह भाजपच्या नवीन अध्यक्षांवर असेल तसेच पश्चिम बंगालचा अवघड पेपर देखील नवीन अध्यक्षांना सोडवावे लागेल.

BJP Pune
Chhagan Bhujbal fake news : मंत्री भुजबळांच्या मृत्यूची खोटी पोस्ट समाज माध्यमांमध्ये व्हायरल; सायबर पोलिस गुन्हेगारांच्या मागावर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com