ADR Report : 82 टक्के देणग्या एकट्या भाजपला, 'टाटा' 'एलेव्हेटेड' सर्वात मोठे देणगीदार; काँग्रेसची काय स्थिती?

BJP Received Donations Tata Group : ‘एडीआर’च्या अहवालानुसार, २२८ कंपन्या आणि उद्योगसमूहांनी मिळून 2024-25 या वर्षात 3,636.81 कोटी रुपयांची देणगी दिली
ADR report highlights BJP receiving the highest share of political donations, with Tata named as the largest contributor.
ADR report highlights BJP receiving the highest share of political donations, with Tata named as the largest contributor.sarkarnama
Published on
Updated on

BJP News : आर्थिक वर्ष 2024-25मध्ये निवडणूक विश्‍वस्त संस्थांमध्ये एकूण 3,826.34 कोटी रुपयांचे योगदान जमा झाले आणि या संस्थांनी विविध राजकीय पक्षांना 3,26.35 कोटी रुपये वितरित केले, असे ‘असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ (एडीआर) या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. वितरित निधीपैकी सर्वाधिक ८२ टक्के निधी सत्ताधारी भाजपच्या वाट्याला आला आहे.

विविध कंपन्या, संस्था आणि व्यक्तींद्वारे राजकीय पक्षांना दिला जाणारा निधी निवडणूक विश्‍वस्त संस्थांमार्फत दिला जातो. अशा वीस संस्थांची नोंद असून त्यापैकी 10 संस्थांनी त्यांच्याकडे जमा झालेल्या देणग्यांचा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. ‘एडीआर’च्या अहवालानुसार, या संस्थांकडे 2024-25 मध्ये 3,836.34 कोटी रुपये जमा झाले होते.

नियमानुसार, या संस्थांना त्यांच्याकडे जमा झालेल्या निधीपैकी 95 टक्के रक्कम राजकीय पक्षांना वितरित करावी लागते. यातील सर्वाधिक 82.52 टक्के रक्कम भाजपला, 7.81 टक्के रक्कम काँग्रेसला, तर 2.67 टक्के रक्कम तृणमूल काँग्रेसला मिळाली आहे. विश्‍वस्त संस्थांपैकी प्रुडन्ट इलेक्टोराल ट्रस्ट या संस्थेने सर्वाधिक 2,688.46 कोटी रुपये 15 पक्षांमध्ये वितरित केले. तर, प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्ट या संस्थेने 914.97 कोटी रुपये दहा पक्षांना दिले.

‘एडीआर’च्या अहवालानुसार, 228 कंपन्या आणि उद्योगसमूहांनी मिळून 2024-25 या वर्षात 3,636.81 कोटी रुपयांची देणगी दिली, तर 99 व्यक्तींनी मिळून 187.62 कोटी रुपयांची देणगी दिली.

पक्षांना मिळालेला निधी (कोटी रुपयांमध्ये)(२०२४-२५)

1. भाजप - 3,157.65

2. काँग्रेस - 298.77

3. तृणमूल काँग्रेस - 102

4. इतर 19 पक्ष मिळून - 267.91

सर्वांत मोठे देणगीदार (कोटी रुपयांमध्ये)

1. एलेव्हेटेड ॲव्हेन्यू रिॲल्टी एलएलपी - 500

2. टाटा सन्स प्रायव्हेट लि. - 308.13

3. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लि. - 217.62

4. मेघा इंजिनिअरिंग - 175

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com