J P Nadda News: काशी-मथुरा मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपची माघार? धार्मिक नव्हे तर 'या' मुद्द्यावर निवडणूक लढवणार; जे.पी. नड्डांचे संकेत

J P Nadda On Kashi-Mathura Controversial Land काशी व मथुरेमध्ये मंदिर बांधण्यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केलेले दावे नड्डा यांनी फेटाळून लावले.
J P Nadda
J P NaddaSarkarnama

J P Nadda On Kashi-Mathura Temple: अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम सुरू झाल्यानंतर काशी-मथुरेतेही मंदिर उभारलं जाणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. मात्र, काशी किंवा मथुरेमध्ये मंदिर उभारणीचं भाजपचं कोणतंही नियोजन नसल्याचं मोठं वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) यांनी केलं आहे.

तसेच वाजपेयींच्या काळात पक्षाला चालवण्यासाठी आरएसएसची (RSS) गरज होती. त्यावेळी भाजप लहान पक्ष होता. सुरुवातीला आम्ही थोडे अकार्यक्षम होतो, त्यामुळे पक्षाला आरएसएसची गरज होती. मात्र आता भाजप (BJP) ताकदवान झाला असल्याचं वक्तव्य नड्डा यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन विरोधकांनी भाजपवर टीका करायला देखील सुरुवात केली आहे. अशातच आता नड्डा यांनी काशी-मथुरेतील वादग्रस्त जागेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंदिर बांधण्याची कोणताही प्लॅन नाही

काशी किंवा मथुरेमध्ये (Kashi-Mathura) मंदिर उभारणीचं भाजपचा कोणताही प्लॅन नसल्याचं वक्तव्य नड्डा (J P Nadda) यांनी केलं आहे. तसेच, यासंदर्भात अनेकांकडून भावनिक दावे केले जात असल्याचंही ते म्हणाले आहेत. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना नड्डा यांनी काशी-मथुरेसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलतना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गरीब, शोषित, दलित, महिला, तरुण, शेतकरी आणि मागास वर्गावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सर्व घटकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना अतिरिक्त बळ देण्याची गरज आहे. आपण त्यांना सक्षम करायलाच हवं. तसेच काशी किंवा मथुरेतील वादग्रस्त जागेवर मंदिर बांधण्याची कोणताही प्लॅन किंवा इच्छा भाजपची नसून आता यावर पक्षात कोणतीही चर्चा होत नसल्याचं नड्डा म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता भाजपच्या काही नेत्यांनी या मंदिरांबाबत केलेल्या दाव्याचं काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

तर काशी व मथुरेमध्ये मंदिर बांधण्यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केलेले दावे नड्डा यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले, आमच्या भुमिकेबाबत कोणताही संभ्रम नाही. भाजपने जून 1989 च्या पालमपूर प्रस्तावामध्ये राम मंदिराचा मुद्दा समाविष्ट केला होता. अनेक वर्षाच्या संघर्षानंतर राम मंदिर अस्तित्वात आलं. ते आमच्या अजेंड्यावरही होतं.

J P Nadda
J P Nadda On RSS : 'संघा'ची पक्षाला गरज आहे का? नड्डा म्हणाले, 'आज भाजप मोठा झाला...'

मात्र, काही लोक भावनिक होतात किंवा उत्साहात इतर मुद्द्यांवर बोलतात. आमचा पक्ष मोठा आहे. प्रत्येक नेत्याची बोलण्याची वेगळी पद्धत असते असं म्हणत त्यांनी योगी आणि बिस्वा यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं. नड्डांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता भाजपने काशी व मथुरा मंदिराचा मुद्यावरुन माघार घेतली आहे का? लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी भाजप मवाळ भुमिका घेत आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com