J P Nadda On RSS : 'संघा'ची पक्षाला गरज आहे का? नड्डा म्हणाले, 'आज भाजप मोठा झाला...'

Lok Sabha Election 2024 : पक्षाची रचना आता मजबूत झाली आहे. आम्ही ताकदवान झालेलो आहोत. भाजप आता स्वबळावर चालतो.
J P Nadda On RSS
J P Nadda On RSSSarkarnama

Delhi Latest News : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी एका मुलाखतीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) हे पक्षाची वैचारिक आघाडी असल्याचे म्हटले आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कालावधीच्या तुलनेत भाजपमधील आरएसएसची महत्त्व काय आहे? या प्रश्नावर उत्तर देताना नड्डा म्हणाले, पक्षाची रचना आता मजबूत झाली आहे. आम्ही ताकदवान झालेलो आहोत. भाजप आता स्वबळावर चालतो.

जेपी नड्डा यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, वाजपेयींच्या काळात पक्षाला चालवण्यासाठी आरएसएसची गरज होती. कारण त्यावेळी भाजप कमी सक्षम आणि लहान पक्ष होता. सुरुवातीला आम्ही थोडे अकार्यक्षम होतो, पक्ष त्यावेळी कमकुवत होता. पक्षाला आरएसएसची गरज होती. आज भाजप ताकदवान झाला आहे. पूर्वीपेक्षा अधिक सक्षम आहेत. भाजप आता स्वतः चालवत आहे. हाच फरक आहे." (J P Nadda On RSS)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

J P Nadda On RSS
Lok Sabha Election 2024 : शिवसेनेच्या 'स्टार प्रचारकांमध्ये' मोदी, शाह, नड्डा, गडकरी, फडणवीस, अजित पवारांसह चाळीस जणांची फौज...

भाजपला आरएसएसच्या (RSS) पाठिंब्याची गरज आहे का, या प्रश्नावर जे.पी. नड्डा म्हणाले, भाजप पक्ष मोठा झाला आहे आणि पक्षाचे नेते त्यांची कर्तव्ये आणि भूमिका यथायोग्य पार पाडत आहे. आरएसएस ही सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे, तर भाजप हा राजकीय पक्ष आहे. आरएसएस वैचारिकपणे काम करत आहे. आम्ही आमचा कारभार आमच्या पद्धतीने हाताळतो. हेच राजकीय पक्षांनी केले पाहिजे." (Lok Sabha ELection 2024)

J P Nadda On RSS
BJP Politics: भाजपमध्ये 75 व्या वर्षी निवृत्त होण्याची अलिखित परंपरा कधी सुरू झाली?

भाजपच्या वाटचालीत संघाची भूमिका -

संघाची स्थापना 27 सप्टेंबर 1925 रोजी झाली होती. ते भाजपची मातृसंघटना मानली गेली आहे. सांस्कृतिक आणि वैचारिक मार्गदर्शन संघाने भाजपला केले आहे. यामुळे भाजपला आजची राजकीय उंची गाठणे शक्य झाले आहे. भाजपचे (BJP) अनेक ज्येष्ठ नेते संघाचे कार्यकर्ते आणि सदस्य आहेत. (Latest Marathu News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com