
Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. भाजप प्रणित एनडीए आघाडी पुन्हा सत्तेत आली आहे. सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले. आता 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतील राजकीय पक्षांनी केलेल्या खर्चाविषयी एसोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने अहवाल प्रसिद्ध केला आहे.
एडीआरच्या अहवालानुसार एकट्या भाजपने लोकसभा निवडणूक 2024 च्या वेळी 1 हजार 494 कोटी रुपये खर्च केले. राजकीय पक्षांकडून झालेल्या खर्चात एकट्या भाजपचा वाटा 44.56 टक्के आहे. तर, भाजपनंतर काँग्रेस पक्ष खर्चात दुसऱ्या स्थानी आहे. काँग्रेसने तब्बल 620 कोटी रुपये खर्च केले आहेत. राजकीय पक्षांनी केलेल्या निवडणुकीतील खर्चात काँग्रेसचा वाटा 18.5 टक्के आहे.
एडीआरने राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील 32 पक्षांच्या खर्चाचे विश्लेषण केले आहे. या पक्षांनी 16 मार्च ते 6 जून 2024 या दरम्यान लोकसभा आणि आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा व सिक्किम येथे झालेल्या विधानसभा निवडणूक लढल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत 3 हजर 352.81 कोटी रुपये पक्षांनी खर्च केले. त्यामध्ये राष्ट्रीय पक्षांचा हिस्सा 2 हजार 204 कोटी म्हणजे 65.75 टक्क्यांपेक्षा अधिक होता.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या एकुण झालेल्या खर्चात 62 टक्क्यांपेक्षा अधिक वाटा काँग्रेस आणि भाजपचा आहे. तसेच फक्त राष्ट्रीय पक्षांनी केलेल्या खर्चाचा विचार केला तर त्यांनी या निवडणुकीत 6930.246 कोटी रुपये खर्च केले. हा खर्च एकुण खर्चाच्या तब्बल 93.08 टक्के आहे. तर, राज्यस्तरीय पक्षांनी केलेला खर्चा हा 515.32 कोटी म्हणून केवळ 6.92 टक्के आहे.
राजकीय पक्षांना निवडणुकीत झालेला खर्चचा हिशोब हा 90 दिवसांच्या आधी देणे आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीत तो 75 दिवसांत द्यावा लागतो. मात्र, एडीआरने केलेल्या पाहाणीत राजकीय पक्षांनी खर्चाचा हिशोब उशीरा दिला.निवडणूक आयोगाला आम आदमी पार्टीने खर्चाचा हिशोब तब्बल 168 दिवस उशीरा दिला. तर,भाजपाने 139 से 154 दिवस उशीरा हिशोब सादर केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.