अध्यक्षपदासाठी नाव जाहीर होण्यापुर्वीच नानांनी पृथ्वीराज चव्हाणांना भरवला केक...

Prithviraj chavan आणि Sangram Thopate यांची नाव आघाडीवर
Nana Patole - Prithviraj chavan

Nana Patole - Prithviraj chavan

Sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेत सध्या अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २८ डिसेंबर रोजी आवाजी मतदानाने ही निवड होणार आहे. या निवडणुकीसाठी २७ डिसेंबर रोजी अर्ज भरायचे आहेत. सध्या या पदासाठी महाविकास आघाडीकडून उमेदवाराची घोषणा झालेली नाही. पण हे पद काँग्रेस पक्षाकडेच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आणि आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopate) यांची नाव सध्या आघाडीवर आहे.

थोडक्यात काय तर अजून कोणत्याही उमेदवाराचे नाव घोषित झालेले नाही. मात्र त्यापुर्वीच आज काँग्रेस कार्यलायात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना केक भरवला. त्यामुळे सहाजिकच या प्रसंगाची राज्यभरात मोठी चर्चा झाली. अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर होण्यापुर्वीच नानांनी पृथ्वीराज चव्हाणांना केक भरवल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचेच नाव अध्यक्षपदासाठी अंतिम झाले आहे का? आणि केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे का? असे सवालही विचारले जावू लागले.

<div class="paragraphs"><p>Nana Patole - Prithviraj chavan</p></div>
संग्राम थोपटेंची प्रतिक्षा संपणार? 28 डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक

याबद्दल नाना पटोले (Nana Patole) यांना विचारले असता त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, आम्ही केवळ ख्रिसमस आहे म्हणून केक कापला आणि एकमेकांना भरवला. याचा कोणताही राजकीय अर्थ काढण्यात येवू नये. दिल्लीवरून अध्यक्षपदाचे नाव अद्याप अंतिम झालेले नाही. राज्यपालांना या निवडणुकीबाबत कळवले आहे, पण त्यांच्याकडून अद्याप कोणतेही पत्र आलेले नाही. सोमवारी ही निवडणूक होणार आहे. हायकमांड यावर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे उद्या संध्याकाळपर्यंत नाव जाहीर होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले.

<div class="paragraphs"><p>Nana Patole - Prithviraj chavan</p></div>
फडणवीस, दानवेंची भाजपला भली मोठ्ठी देणगी!

पृथ्वीराज चव्हाणांनी जोडले हात...

यावेळी पत्रकारांनी पृथ्वीराज चव्हाण यांना तुमचे नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हात जोडले. त्यामुळे अद्यापही विधानसभा अध्यक्षपदासाठी नेमके कोण याबाबत सस्पेन्स कायम आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com