फडणवीस, दानवेंची भाजपला भली मोठ्ठी देणगी!

Bjp india : देशभरात ‘micro donation’ अभियानाचा शुभारंभ
Devendra Fadnavis - Raosaheb Danave 

Devendra Fadnavis - Raosaheb Danave 

Sarkarnama

मुंबई : भाजप (Bjp) हा देशातील सर्वात श्रीमंत पक्ष समजला जातो. गत वर्षात भाजपला तब्बल ७५० कोटी रुपयांची देणगी मिळाली असल्याचा आकडा समोर आला होता. यात फुडेंट इलेक्ट्रोरल ट्रस्टने २१७ कोटी रुपये, आयटीसी ग्रुपने ७६ कोटी, जनकल्याण ट्रस्टने ४५.९५ कोटी, महाराष्ट्रातील बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शनने ३५ कोटी, लोढा डेव्हलपर्सने २१ कोटी अशी भली मोठी रक्कम भाजपला दान दिली होती. त्याच भाजपने आता देशभरात ‘micro donation’ अभियानाचा शुभारंभ केला आहे.

आज दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal bihari vajpayee) यांच्या जयंतीनिमित्त भाजपने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याच निमित्त आज भाजपने देशभरात ‘micro donation’ अभियानाचा शुभारंभ केला आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी पक्षाला मोठी देणगी दिली आहे. १००० रुपयांची देणगी या अभियानंतर्गत या नेत्यांनी भाजपला देणगी देवू केली आहे.

<div class="paragraphs"><p>Devendra Fadnavis - Raosaheb Danave&nbsp;</p></div>
"जाताना मी सुद्धा पारीख काकांची पप्पी घेवून जाणार" : शिवेंद्रराजेंचे प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, माझी भाजपला पक्षनिधी म्हणून छोटीशी देणगी. आपला पक्ष कायमच देशाला प्रथम मानतो. भाजपने आज श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त आज ‘micro donation’ अभियानाचा शुभारंभ केला आहे. माझे सर्वांना आवाहन आहे की, प्रत्येकाने पक्षासाठी छोटेसे योगदान द्या आणि भाजपला सशक्त करा!

तर रावसाहेब दानवे म्हणाले, मी नमो अॅपच्या 'डोनेशन' मॉड्यूलचा वापर करून भाजपला मजबूत करण्यासाठी माझे स्वतःचे नम्र योगदान दिले आहे. रेफरल कोड वापरून, तुम्ही या जनआंदोलनामध्ये मित्र आणि कुटुंबीयांना जोडू शकता आणि निःस्वार्थपणे लोकांची सेवा सुरू ठेवण्यासाठी भाजपला सक्षम करू शकता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com