Operation Lotus in Delhi : ''दिल्लीत निकालाआधीच 'Operation Lotus' झालं सुरू'' ; 'AAP'च्या बड्या नेत्याचा दावा!

AAP Vs BJP in Delhi :''आमदारांना विकत घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. काहींमध्ये ते यशस्वी देखील झाले आहेत. पैसा आणि तपास यंत्रणांचा वापर सुरू आहे.''असाही आरोप आम आदमी पार्टीकडून केला गेला आहे.
BJP AAP And Delhi Vidhansabha
BJP AAP And Delhi VidhansabhaSarkarnama
Published on
Updated on

Delhi Vidhan Sabha Election 2025 : दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले. तर ८ फेब्रुवारी रोजी निकाल लागणार आहे. तत्पुर्वी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर समोर आलेल्या विविध एक्झिट पोलनुसार दिल्लीत यंदा सत्ताबदल होणार असून, भाजपकडे सत्तेच्या चाव्या असणार असल्याचे दिसत आहे. तर आम आदमी पार्टीची सत्तेची हॅटट्रिक हुकणार असल्याचं दर्शवलं गेलं आहे. दरम्यान, निवडणुकीचा निकाल समोर येण्याआधीच दिल्लीत 'ऑपरेशन लोटस'ला सुरुवात झाली असल्याचा दावा आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी केला आहे.

संजय सिंह(Sanjay Singh) यांनी आरोप केला आहे की, दिल्लीत भाजपने 'ऑपरेशन लोटस'ला सुरुवात केली आहे. 8 फेब्रुवारीच्या आधीच भाजपने पराभव मान्य केला आहे. आमदारांना विकत घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. काहींमध्ये ते यशस्वी देखील झाले आहेत. पैसा आणि तपास यंत्रणांचा वापर सुरू आहे. दिल्लीत आमच्या दोन मंत्र्यांना तोडलं, आम्ही मोठ्या संघर्षानंतर दिल्लीला वाचवलं.

BJP AAP And Delhi Vidhansabha
Ajit Pawar to Mahesh Landge : ...अन् संतापलेल्या अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांसमोरच महेश लांडगेंना सुनावलं!

या संपूर्ण प्रकरणात आम्ही आमचे जे आमदार निवडणूक लढवत आहेत, त्यांना सांगितले आहे की जेवढेपण यासंदर्भातील फोन येतील, त्या सर्वांची रेकॉर्डिंग करा. त्याबाबत तक्रार नोंदवा, जर तुम्हाला कोणी भेटून ऑफर देत असेल तर त्याचा गुप्त कॅमेऱ्याद्वारे व्हिडिओ बनवा. याबाबतची माहिती मीडिया आणि नंतर सर्वांना दिली जाईल. आम्ही आमच्या आमदरांना सतर्क केले आहे.

याशिवाय खासदार संजय सिंह यांनी असंही म्हटले की, दोन गोष्टी अतिशय स्पष्ट झाल्या आहेत. पहिली गोष्ट अशी की 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणीच्या आधीच भाजपने(BJP) आपला पराभव मानला आहे. ते वाईटरित्या पराभूत होत आहेत. दुसरी गोष्टी म्हणजे आमदारांच्या खरेदीची पद्धत ते संपूर्ण देशभरात अवलंबवतात, तेच आता दिल्लीतही सुरू केलं आहे. याला अनेकदा ऑपरेशन लोटस आणि नाही माहीत काय-काय नावं दिली जातात. पैसा आणि तपास यंत्रणा यापैकी ज्याचा परिणाम होईल, त्याचा दबाव टाकून आमदार फोडले जातात.

BJP AAP And Delhi Vidhansabha
Dhananjay Munde : मौका भी है, दस्तूर भी है...! करुणा मुंडे प्रकरण सरकारच्या मदतीला, धनंजय मुंडेंची सुटका नाही?

याचबरोबर संजय सिंह यांनी म्हटले की, अनेक आमदारांनी आम्हाला कळवले आहे की, आमच्या सात आमदारांकडे 15-15 कोटी रुपये नेत, पक्ष सोडण्याची, पक्ष फोडण्याची आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर आलेली आहे. एक-दोन जणांना तर प्रत्यक्ष भेटून ऑफर दिली गेली आहे. आम आदमी पार्टीला सोडून भाजपसोबत येत सरकार बनवण्याबाबत बोललं जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com