Ajit Pawar to Mahesh Landge : ...अन् संतापलेल्या अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांसमोरच महेश लांडगेंना सुनावलं!

Ajit Pawar is angry with Mahesh Landge : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जाहीर कार्यक्रमात घडला प्रकार; जाणून घ्या, नेमकं कोण काय म्हणाले?
Ajit Pawar to Mahesh Landge
Ajit Pawar to Mahesh LandgeSarkarnama
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad Municipal Corporation : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या उद्घाटनासाठी आज (गुरुवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीच्या अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमादरम्यान महायुतीतील दोन पक्षातील दादांमध्ये टोलेबाजी झाल्याचे पाहायला मिळालं. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांनी संताप व्यक्त केला आणि शेलक्या शब्दांमध्ये अजितदादांनी महेश लांडगे यांना सुनावलं. विशेष म्हणजे यावेळी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील मंचावर उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनाचा कार्यक्रमाचे आयोजन आज पिंपरी चिंचवड येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) हे उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान महेश लांडगे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक केलं मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख टाळला. पिंपरी चिंचवडच्या विकासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याचं महेश लांडगे यांनी सांगितलं. मात्र त्यावेळी अजित पवार यांनी केलेल्या पिंपरी चिंचवडच्या विकासाबद्दल लांडगे काहीच बोलले नाहीत. यामुळे अजित पवारांनी महेश लांडगे यांना भाषणादरम्यान सुनावलं.

Ajit Pawar to Mahesh Landge
Trupti Desai : धनंजय मुंडे यांचा पापाचा घडा भरत आला, आता मुख्यमंत्री राजीनामा घेणार?

महेश लांडगे(Mahesh Landge) म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराची खरी ओळख 2014 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून झाली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तायाला मंजुरी दिली आणि आज ते पुन्हा मुख्यमंत्री असताना याचे भूमिपूजन सुद्धा होत आहे. पिंपरी-चिंचवड शहराची ओळख पुण्याच्या खाली कुठेतरी लपल्यासारखी होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पिंपरी-चिंचवडची वेगळी ओळख आणि अस्तित्व निर्माण झालं आहे.

महेश लांडगे पुढे म्हणाले, मध्यंतरी एक बातमी आली होती अनेक जिल्ह्यांचे विभाजन होणार आहे. म्हणजे तुम्ही करणार असाल तर मी सांगतो माझा तसा काही उद्देश नाही. ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विभाजन करायचं झालं तर एका जिल्ह्याला शिवनेरी असं नाव द्यावं ही माझी विनंती असल्याचं महेश लांडगे यांनी सांगितलं.

Ajit Pawar to Mahesh Landge
Income Tax raid : घरवापसी पूर्वीच घुसले इन्कम टॅक्सचे अधिकारी, 30 तासानंतर ही निघेणात बाहेर, दादांच्या निकटवर्ती याची कोंडी?

महेश लांडगे यांच्या भाषणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी(Ajit Pawar) भाषण केले. यादरम्यान अजित पवार म्हणाले, आता लांडगे यांनी पिंपरी चिंचवडच्या विकासाबाबत सांगितलं. त्यांना काय वाईट वाटलं माझं नाव घ्यायला मला माहिती नाही. परंतु अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहीत आहे. 1992 ला मी तुमचा खासदार झालो 92 ते 2017 कोणी पिंपरी-चिंचवड सुधरवलं. आज 25 वर्ष झाली प्रत्येक गोष्ट मी पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष देऊन करत असतो. इथल्या अधिकाऱ्यांना विचारा या इमारतींमध्ये मी किती वेळा येतो किती वेळा चौकशी करतो आणि किती वेळा बसतो. शेवटी आपण महायुतीमध्ये आहोत त्यामुळे ज्यांनी चांगलं केलं त्याला चांगले म्हणायला शिका. एवढाही कंजूषपणा दाखवू नका. मी दिलदार आहे ज्याने केलं त्याला त्याच क्रेडिट देत असतो असा टोला त्यांनी महेश लांडगे यांना लगावला.

कुणीतरी बातम्या उठवतो 26 जानेवारीला 21 जिल्हे जाहीर केले जाणार मात्र आता एकही जिल्हा जाहीर केला जाणार नाही. आता जे चाललंय ते चांगलं चाललेलं आहे. ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस सरकार निर्णय घेईल. परंतु उगीचच काहीही बातम्या करू नका. या शब्दात अजित पवार यांनी सुनावलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com