Suvendu Adhikari News : नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत देखील भाजपला अनेक ठिकाणी पराभवाचा सामाना करावा लागला. यावरून पश्चिम बंगालमधील भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी एका कार्यक्रमात सबका साथ सबका विकास बंद करा, अशी मागणी केली.
'आता आम्ही सबका साथ सबका विकास म्हणणार नाही, जे आमच्या सोबत आम्ही त्यांच्या सोबत', असे वादग्रस्त वक्तव्य सुवेंदू अधिकारी यांनी केले.
सुवेंदू अधिकारी Suvendu Adhikari म्हणाले, राष्ट्रवादी मुस्लिम सारखे काही नाही. जे आमच्या सोबत नाही आम्ही त्यांच्या सोबत नाही. शिवाय अल्पसंख्याक मोर्चाची देखील आवश्यकता नाही. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या पराजयाचे कारण हिंदुंना येथे मतदान करू दिले गेले नाही, असा दावा देखील सुवेंदू यांनी केला आहे.
सुवेंधू अधिकारी यांचे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या टीका करण्यात येत होती. मात्र असे वक्तव्य आपण केले नाही. भाजप BJP कार्यकर्त्यांना उल्लेशून कार्यकारिणी कार्यक्रमात मी जो पक्षाला साथ देईल पक्ष त्याला साथ देईल असे म्हटलो.हे मी राजकीय वक्तव्य केले. सबका साथ सबका विकास ही घोषणा पंतप्रधानांनी दिली आहे. ती कायम आहे.
नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये सबका साथ सबका विकास ही घोषणा दिली होती. या घोषणेमुळे भाजपला मोठ्या प्रमाणात मतदान झाले होते. 2014 मध्ये पहिल्यांदा भाजप स्वबळावर बहुमत मिळवत सत्तेत आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.