माजी मुख्यमंत्र्यांचा पत्ता कट? भाजप PM मोदींच्या चेहऱ्यावरच लढवणार आगामी निवडणूक

Rajsthan | Vasundhara Raje | : भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची मोठी घोषणा
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

जयपूर : राजस्थानमध्ये (Rajsthan) भाजप (BJP) आगामी विधानसभा निवडणूक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याच चेहऱ्यावर लढवणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतिश पूनिया (Satish Puniya) यांनी शनिवारी केली आहे. पूनिया यांची ही घोषणा म्हणजे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje) यांच्यासाठी एक मोठा झटका मानला जात आहे. राजस्थानमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक पार पडणार आहे.

पूनिया पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीमध्ये अनेकदा चेहऱ्याची घोषणा केली जाते, अनेकदा ती केली जात नाही. २०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने योगी आदित्यनाथ यांच्या चेहऱ्याची घोषणा केली नव्हती. मात्र तरीही भाजपने निवडणूक जिंकली होती. त्याच प्रमाणे राजस्थानमध्येही आम्ही आगामी निवडणुकीसाठी कोणत्याही चेहऱ्याची घोषणा करणार नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच चेहऱ्यावर ही निवडणूक लढवणार आहे.

Narendra Modi
मोठी बातमी : प्रकाश आंबेडकरांना ED ची नोटीस : म्हणाले, "### दम असेल तर मला उचला"

जयपूरमधील भाजपच्या तीन दिवसीय रणनिती बैठकीच्या दुसऱ्या दिवशीच पूनिया यांनी हे वक्तव्य केले आहे. राज्य भाजपच्या प्रमुखांंनीच ही घोषणा केल्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीवरुन वसुंधरा राजे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. नुकताच वसुंधरा राजे यांनी आपल्या वाढदिवसादिवशी समर्थक खासदार आणि आमदारांना सोबत घेत शक्तीप्रदर्शन केले होते.

Narendra Modi
'सरकारनामा' पोल : संभाजीराजेंची अपक्ष भूमिका योग्य; शिवसेनेची उमेदवारी स्वीकारु नये

याशिवाय यापूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये नुकताच पार पडलेल्या रोड शो आणि व्यासपीठावर पूनिया यांच्यासह वसुंधरा राजे देखील दिसून आल्या होत्या. मात्र पूनिया यांच्या या घोषणेनंतर विधानसभा निवडणुकीमध्ये राजे यांच्यावर प्रमुख जबाबदारी असेल मात्र त्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार नसतील असे संकेत मिळत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com