"होय मी लाभार्थी" : महाराष्ट्रात ट्रोल झालेल्या वाक्यावर भाजपची गोव्यात जाहिरातबाजी

Goa Assembly election : देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील जाहिरात आता गोव्यात
Goa BJP Advertisement And Devendra Fadnavis
Goa BJP Advertisement And Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

पणजी : गोव्यात सध्या विधानसभा निवडणुकांचे (Goa Assembly election) वातावरण तापले आहे. त्यामुळे एरवी पर्यटकांसाठी महत्वाचे असलेले राज्य आता राजकीय नेत्यांसाठीही महत्वाचे बनले आहे. अशातच महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर भाजपने गोव्याच्या निवडणुकीची संपुर्ण जबाबदारी सोपवली आहे. त्याशिवाय शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हे पक्ष गोवा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामुळे गोव्याची निवडणूक महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे.

महाराष्ट्रासोबत या निवडणुकीचे आणखी एक कनेक्शन म्हणजे भाजपची निवडणूक प्रचारातील मुख्य जाहिरात. २०१७ साली महाराष्ट्रात ज्या "होय मी लाभार्थी, हे माझेच सरकार" वाक्यावर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार प्रचंड ट्रोल झाले होते, त्याच वाक्यावर भाजपचा आता गोव्यात प्रचार सुरु आहे. तिथली वृत्तपत्र, भाजपची सोशल मिडीया अकाऊंट्स, वृत्तवाहिन्या अशा सर्व ठिकाणी याच जाहिरातीच्या माध्यमातून भाजपचा प्रचार सुरु आहे. या जाहिरातीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटोही दिसून येत आहे.

Goa BJP Advertisement And Devendra Fadnavis
राऊत शब्दाचे पक्के; उत्पल पर्रीकरांचा अर्ज वैध ठरताच घेतला मोठा निर्णय

२०१७ साली महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला ३ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त सरकारकडून ही "होय मी लाभार्थी, हे माझेच सरकार" ही जाहिरात करण्यात आली होती. या जाहिरातीमध्ये सरकारच्या योजनांमुळे सर्वसामान्यांना कसा फायदा झाला? रस्ते, शेती, शिक्षण, घरकूल, जलसंधारण, डिजिटल व्हिलेज, अशा वेगवेगळ्या विषयांवर काय कामं झाली हे लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील लाभार्थ्यांसह मुद्रित आणि दृकश्राव्य माध्यमातून ही जाहिराती करण्यात आली होती.

Goa BJP Advertisement And Devendra Fadnavis
उत्तरप्रदेशात नात्यांमध्येच टफ फाईट ; भाऊ-बहीण, सासरा-सून मैदानात

मात्र, सोशल मीडियावर सरकारच्या या जाहिरातींचे विडंबन करून मोठ्या प्रमाणावर खिल्ली उडवली गेली. 'मी लाभार्थी' हा चेष्टेचा विषय बनला होता. मी लाभार्थी सरसकट कर्जमाफी न मिळाल्याचा, मी लाभार्थी शेतमालास चांगला बाजार भाव न मिळाल्याचा, मी लाभार्थी वाढलेल्या बेरोजगारीचा, मी लाभार्थी वाढलेल्या गुन्हेगारीचा, वाढलेल्या महागाईचा, मी लाभार्थी न मिळालेल्या मराठा, धनगर, मुस्लिम, आरक्षणाचा, मी लाभार्थी न मिळालेल्या शेतीमाल हमीभावाचा अशा प्रकारच्या वाक्यामधून सरकारची जाहिरात चेष्टेचा विषय बनवण्यात आला होता. परिणामी काही दिवसांतच सरकारला ही जाहिरात मागे घ्यावी लागली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com