भाजप विद्यमान ५० आमदारांचा पत्ता कट करणार?; विजयासाठी प्रत्येक मतदारसंघात सर्वेक्षण

वयाची ७० वर्षे ओलांडलेल्या नेत्यांना उमेदवारी मिळणार नाही; जे. पी. नड्डांच्या उपस्थितीत सोळापासून राज्य कार्यकारिणीची बैठक
BJP Flags
BJP Flags Sarkarnama

बंगळूर : भारतीय जनता पक्षाने (BJP) कर्नाटकमधील (Karnataka) आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदारपणे चालवली आहे. पक्षाकडून प्रत्येक मतदारसंघातील विजयासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. विद्यमान आमदारांची सार्वजनिक आणि वैयक्तिक लोकप्रियता पाहण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून तीन पथके अगोदरच कर्नाटकात पाठविण्यात आली आहेत. सरकारविरोधातील ट्रेंड बदलण्यासाठी भाजपकडून विद्यमान किमान ४० ते ५० आमदारांचे तिकिट कापून त्या ठिकाणी नव्यांना संधी देण्याचे प्लॅनिंग आहे. त्यासाठी संभाव्य पर्यायी उमेदवार कोण असावा, यासाठीही प्रत्येक मतदारसंघात या सर्वेक्षणाच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे. (BJP will cut the candidature of 50 existing MLAs in Karnataka)

कर्नाटक विधानसभेची निवडणूक आगामी २०२३ या वर्षात होणार आहे. त्याची तयारी सर्वच पक्षाकडून करण्यात येत आहे. पण, सत्ताधारी भाजपकडून मात्र बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास करण्यात येत आहे. त्यामध्ये नाराज उमेदवारांचे तिकिट कापून नव्यांना संधी देण्याबरोबरच वयाची ७० ओलांडलेल्या ज्येष्ठ आमदारांना तिकीट न देण्याच्या निर्णयावर केंद्रीय नेते ठाम आहेत. तसेच, मागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवारांनाही तिकिट देण्यास पक्षश्रेष्ठी तयार नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

BJP Flags
भावाच्या अपघातानंतर गोपीचंद पडळकर सातारा दौरा सोडून विट्याकडे रवाना

भाजपकडून करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणात विद्यमान आमदारांनी पक्ष कार्यालयाला किती वेळा भेट दिली. ब्लॉकस्तरीय कार्यक्रम घेऊन संघटना मजबूत करण्याचे काम केले का आणि ब्लॉक भेटीदरम्यान कार्यकर्त्यांची भेट घेतली का, आदी गोष्टींची माहिती घेण्यात येत आहे. प्रत्येक पॅनेलमध्ये नऊ ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असलेल्या तीन समित्यांची स्थापनाही पक्ष करणार आहे. हे पॅनेल राज्यातील सर्व जिल्ह्यांचा दौरा करून सरकारची कामगिरी आणि विद्यमान आमदारांच्या कामांबाबत कार्यकर्त्यांची मते जाणून घेणार आहेत. या दोन्ही सर्वेक्षणातून मते घेऊन पक्ष उमेदवार निश्चित करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

BJP Flags
...तर २०२४ मध्ये सतेज पाटील कोल्हापूर उत्तरचे उमेदवार असतील : फडणवीसांचा गौप्यस्फोट

भाजप नेत्यांच्या मुलांना किंवा कुटुंबातील सदस्यांना तिकीट न देण्याबाबतची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना पक्षाचे वरिष्ठ नेतेही राबविण्यास उत्सुक आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही अनेक विद्यमान आमदारांना तिकिट नाकारण्यात आले होते. तसेच नेतेमंडळींचे नातलाग आणि कुटुंबातील सदस्यांनाही उमेदवारी दिली नव्हती. कर्नाटकातही ते सूत्र राबविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

BJP Flags
एकमेकांचे पाय ओढू नका अन्‌ नातलगांना तिकिटे मागू नका : अजितदादांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावले

नड्डा नेत्यांपर्यंत पोचवणार पंतप्रधानांचा कठोर संदेश

कर्नाटक भाजप कार्यकारिणी समितीची येत्या येत्या १६ आणि १७ एप्रिल रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे विद्यमान आमदारांच्या उमेदवारीबद्दल बोलतील. मुले, नातेवाईकांसाठी पक्षाचे उमेदवारी मिळविण्यासाठी नेत्यांनी दबाव तंत्राचा वापर न करण्याचा पंतप्रधानांचा कठोर संदेश राज्य नेत्यांना देतील, असे सूत्राकडून सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com