एकमेकांचे पाय ओढू नका अन्‌ नातलगांना तिकिटे मागू नका : अजितदादांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावले

लोकसभेला नाराज केले; आगामी निवडणुकीत कसर भरून काढा : अजितदादांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना इशारा
AJit Pawar
AJit PawarSarkarnama
Published on
Updated on

बीड : ‘‘बीड (Beed) जिल्ह्याने लोकसभेला नाराज केले. पण, या पुढील निवडणुकांमध्ये खासदारांसह जिल्ह्यातून सर्व आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) निवडणून यावेत, यासाठी प्रयत्न करा. नगर पंचायतींचाही निकाल पक्षासाठी चांगला लागला नाही. मात्र, आगामी पंचायत समित्या, नगर पालिका, जिल्हा परिषदेत त्याची कसर भरुन काढा. फक्त अडचणी सांगू नका. एकमेकांचे पाय खेचायचे काम करू नका, जनता चांगले काम करते; पण स्टेजवरील नेत्यांमध्ये एकमत व्हायला हवे, फक्त नातलगांना तिकिट मागू नका,’’ अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांना सुनावले. (Don't ask for tickets only for relatives in upcoming elections : Ajit Pawar)

केज तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्याच्या आसवानी प्रकल्पाचे उद्‌घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात पवारांनी जोरदार टोलेबाजी केली. अजित पवारांचे भाषण सुरु झाल्यानंतर त्यांना मास्क काढा, अशी विनंती करण्यात आली. त्यानंतर ‘मी मास्क काढत नाही’ पण, माझी सासूरवाडी मराठवाड्यातील असल्याने ऐकावे लागते, असे म्हणत पवार यांनी तोंडावरील मास्क काढत उर्वरीत भाषण पूर्ण केले. याचदरम्यान, पवारांच्या भाषणावेळी प्रेक्षकातून ऐकाने काही तरी सल्ला दिल्यानंतर ‘सल्ला द्यायला नंतर ये, आता भाषण ऐक’, तरी बरं हा अजून कसा चंद्रावर गेला नाही, अशी मिश्कील टिप्पणी केली. त्यानंतर सभास्थळी पुन्हा एकच हशा पिकला.

AJit Pawar
Silver Oak Attack : पदासाठी पुढे पुढे करणारे राष्ट्रवादीचे पदाधिकारी निषेध सभेकडे फिरकलेही नाहीत!

बजरंग सोनवणे यांनी मुख्य रस्त्यावरुन कारखान्यापर्यंत येणारा रस्ता करुन देण्याच्या मागणीची दखल घेत पवारांनी ‘हा रस्ता स्टार झालेला असेल’ हा अजित पवारचा शब्द असल्याचे आश्वासन दिले. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेबाबत बोलताना राज्यातील चांगल्या उद्योग व संस्थांना बँक किफायत व्याजदारात कर्ज देते. आम्ही काही आमच्या खिशातून देत नाही पण चांगले काम करणाऱ्यांसाठी कायम मदत करतो, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

AJit Pawar
Silver Oak Attack : पवारांना पितृस्थानी मानता अन्‌ वकिली फडणवीसांची करता..? हे दुर्दैवी!

या वेळी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, संदीप क्षीरसागर, संजय दौंड, राजेश्वर चव्हाण, पृथ्वीराज साठे, डॉ. नरेंद्र काळे, बजरंग सोनवणे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com