Narendra Modi News : महागाईच्या मुद्यांवरून विरोधकांना उत्तर देण्यासाठी भाजपची रणनीती ; येत्या काही दिवसात आरोपांना ..

BJP News : विरोधी पक्षांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याची रणनीती तयार करण्यास सुरुवात केली आहे.
Narendra Modi News
Narendra Modi NewsSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजपकडून जल्लोष केला जात असताना विरोधकांनी महागाईच्या प्रश्नावर भाजपला धारेवर धरलं आहे. गेल्या नऊ वर्षात भाजपने केलेल्या कमाल कामगिरीमुळे देश उद्धवस्त झाल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. भाजपच्या धोरणांचा फायदा फक्त त्यांच्या मित्रपक्षांनाच झाला, तेच मालामाल झाले, असा आरोप विरोधक करीत आहेत. विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना आणि अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

भाजपने महागाईच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याची रणनीती तयार करण्यास सुरुवात केली आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना एका भाजप नेत्याने ही माहिती दिली. महागाईवरून भाजपवर टीका करणाऱ्या विरोधकांच्या प्रश्नांना येत्या काही दिवसात भाजप नेते उत्तर देणार आहेत.

Narendra Modi News
Assembly elections News : भाजपकडून निवडणुकीची तयारीला वेग : आज नड्डा उत्तराखंडमध्ये, शाह यांची तेलंगणात सभा

देशात नेहमीच महागाई,अन्नधान्याच्या किमतीत झालेली वाढ हा निवडणुकीचा मुद्दा राहिला आहे. जनता पक्षाच्या सरकारच्या काळात इंदिरा गांधी कांद्याच्या गगनाला भिडलेल्या किमतीच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी कांद्याचे हार घालून फिरू लागल्या. १९८० च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींनी हा मोठा मुद्दा बनवला आणि निवडणूक जिंकून पंतप्रधान झाल्या.

Narendra Modi News
Mumbai-Goa Highway : मनसेच्या जागर यात्रेपूर्वीच रवींद्र चव्हाणांची मोठी घोषणा ; भाजपाचा कार्यकर्ता आहे.., कर्तव्याला चुकणार नाही…

अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने १९९८ मध्ये पोखरणमध्ये अणुचाचण्या घेतल्याने वातावरण निर्माण झाले असतानाही, कांद्याच्या वाढत्या किमतींमुळे भाजपला दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला, आणि तेव्हापासून भाजपला दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवता आलेला नाही.

१५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून महागाईवर बोलताना मोदी म्हणाले होते की, जग महागाईच्या संकटाचा सामना करत आहे, महागाईने संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था खिळखिळी केली आहे. मात्र भारतातील महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने बरेच प्रयत्न केले आहे. जनतेवरील महागाईचा हा बोजा कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न आगामी काळातही सुरूच राहतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com