
दिल्ली विधानसभा निवडणुकीने आता निर्णायक वळणावर पोहोचली आहे. दिल्लीत 27 वर्षानंतर भाजपचं कमळ पुन्हा फुललं आहे. भाजपच्या या जोरदार कमबॅकनंतर दिल्लीत भाजपचे कमळ फुलल्यास दिल्लीकरांसाठी हा मैलाचा दगड ठरला आहे. भाजपची दिल्लीत एकहाती सत्ता आल्यामुळे आणि दिल्लीकरांनी या निवडणुकीत भाजपवर दाखवलेल्या विश्वासामुळे दिल्लीकरांची चांदी होणार आहे.
दिल्लीतील महिलांना दरमहा २५०० रूपये मिळणार.
गर्भवती महिलांना २१००० रूपये.
महिलांना बस प्रवास मोफत
वृद्धांना दरमहा २५०० रूपये पेन्शन,
गरिबांना सिलेंडरवर ५०० रूपयांची सबसीडी
तर होळी आणि दिवाळीला एक एक सिलेंडर मोफत.
२०० यूनिटपर्यंत वीज मोफत
तसेच आयुष्यमान योजने अंतर्गत १० लाखाचा विमा काढण्या येईल.
त्याचबरोबर महिन्याला २० हजार लिटर पाणी मोफत.
भाजप बहुमताने विजयाकडे वाटचाल करत आहे. दिल्लीत भाजपची सत्ता येणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. निवडणुकींपूर्वी भाजपने मतदारांना आकर्षित करण्यासाठी आप'च्या जाहीरनामा हाणून पाडण्यासाठी विविध योजनांचा पाऊस पाडला होता. त्यांचा फायदा निश्चितच भाजपला झाला आहे.
दिल्ली झालेला लिकर घोटाळ्यात आप सरकार चांगलेच बुडाले. इतकेच नाही तर त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. आप नेते मनीष सिसोदिया यांच्यावरही दारू घोटाळ्याचा दाग लागला. त्यात ईडी आणि इतर तपास यंत्रणांचीही एन्ट्री या प्रकरणात झाली. आपच्या अनेक दिग्गज नेत्यांना तुरुंगात जावं लागलं. त्यात भरीस भर अरविंद केजरीवाल यांचाही नंबर तुरुंगवारीत लागला. दिल्ली निवडणुकीचा बिगुल वाजले खरे पण केजरीवालांच्या अडचणी काही थांबताना दिसत नव्हत्या.
अरविंद केजरीवाल यांनी २४ तास स्वच्छ पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. तर दिल्लीतील स्वच्छता व्यवस्था कोलमडली आहे. 2020ला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने झाल्याने हळूहळू लोकांचा आम आदमी पक्षावरील विश्वास उडाला. या आणि इतर काही फॅक्टरमुळे दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मधील निकालात आपचा ‘दारू’न पराभव झाल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.