Delhi Election result 2025 : वर्तुळ पूर्ण! काँग्रेससोबत जे केले, फिरून तेच अरविंद केजरीवालांच्या पुढ्यात आले...

Delhi Vidhan Sabha result 2025 : आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्या राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. काँग्रेसच्या कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करून केजरीवाल यांनी दिल्लीची सत्ता मिळवली होती. आता केजरीवाल यांना कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवरूनच पायउतार व्हावे लागत आहे.
Rahul Gandhi, Arvind Kejriwal
Rahul Gandhi, Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

Delhi Election result 2025 News : आम आदमी पक्षाची (Aam Aadmi Party) प्रतिमा स्वच्छ होती, किमान अरविंद केजरीवाल आणि त्यांचे नेते तसा आविर्भाव तरी आणत होते. केंद्रातील काँग्रेसच्या सरकारविरोधात अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभागी असलेले अरविंद केजरीवाल यांच्यावर दिल्लीच्या मतदारांनी पूर्ण विश्वास दाखवला होता.

मात्र नाकाने कांदे सोलण्याची केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची सवय कायम राहिली. मुख्यमंत्री असताना केजरीवाल यांच्यावर दारू घोटाळ्याचा आरोप झाला आणि समीकरणे बिघडायला सुरुवात झाली. दारू घोटाळ्यात तथ्य नाही, असे आपकडून सांगितले गेले, मात्र मतदारांमध्ये संदेश पाठवण्यात भाजपला यश आले आणि दिल्लीत आपवर झाडू फिरला.

दारू घोटाळ्यात कारागृहात असलेल्या केजरीवाल यांना जामीन मिळाला. बाहेर आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपद सोडले. कारागृहात असताना मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच होते. दिल्लीच्या (Delhi) मतदारांनी आम्हाला पुन्हा निवडून दिले तरच मी मुख्यमंत्री होणार, अशी राणा भीमदेवी थाटातील घोषणा केजरीवाल यांनी केली होती.

निवडणुकीच्या तोंडावर केलेले हे राजकीय नाटक होते, हे जनतेला कळून चुकले होते. निवडणुकीच्या आधी चार महिने आतिषी यांना मुख्यमंत्रिपद मिळाले. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी निर्माण झाली. आतिषी मुख्यमंत्री बनल्या असल्या तरी नियंत्रण केजरीवाल यांचेच राहिले. आप आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असा प्रचार काँग्रेसकडून (Congress) आधीपासूनच केला जात होता.

Rahul Gandhi, Arvind Kejriwal
Delhi Election Results 2025 : "लढा आणि एकमेकांना संपवा..." दिल्ली विधानसभा निकालाची आकडेवारी समोर येताच ओमर अब्दुल्लांचा आप-काँग्रेसवर हल्लाबोल

यामुळे काँग्रेसच्या पदरात काहीही पडले नाही, मात्र आपचे नुकसान झाले. मध्यंतरी दिल्ली येथे झालेल्या धार्मिक दंगलीत केजरीवाल यांची भूमिका पाहता काँग्रेसने केलेल्या प्रचारावर अल्पसंख्याकांचा विश्वास बसला. काँग्रेसच्या कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात प्रचारकी आंदोलन करून, प्रचारकी आरोप करून दिल्लीची सत्ता मिळवलेल्या केजरीवाल यांना कथित दारू घोटाळ्याच्या आरोपावरून सत्तेतून पायउतार व्हावे लागत आहे.

कथित दारू धोरण घोटाळा आपसाठी डोकेदुखी ठरला. या प्रकरणात माजी मंत्री मनीष सिसोदिया, त्यानंतर मुख्यमंत्रिपदावर असताना अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. काँग्रेसवर बेछूट आरोप करून सत्ता प्राप्त केलेल्या अरविंद केंजरीवाल यांनी आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर मात्र आकांडतांडव केला. हे बहुधा मतदारांना आवडलेले दिसत नाही. आरोग्य, शैक्षणिक क्षेत्रात केजरीवाल यांनी केलेल्या सुधारणांचे देशभरात कौतुक झाले, मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपांनी त्यांचा जनाधार निसटल्याचे दिसत आहे.

Rahul Gandhi, Arvind Kejriwal
Anna Hazare News : दिल्लीत भाजपच्या विजयावर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, मी सतत सांगत होतो...

दारू घोटाळ्यात ईडीने केजरीवाल, सिसोदिया यांच्याभोवती फास आवळला होता. या दोघांसह अन्य काही नेत्यांनाही तुरुंगात जावे लागले. एका नेत्याची तुरुंगात जी बडदास्त ठेवण्यात आली होती, त्यामुळे अरविंद केंजरीवाल आणि आपच्या स्वच्छ प्रतिमेच्या चिंधड्या उडाल्या. निवडणुकीला चार महिने असताना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर आतिषी यांना बसवण्यात आले. कामाचा चुणूक दाखवण्यात त्या कमी पडल्या.

त्या मुख्यमंत्री बनल्यामुळे पक्षाचील अन्य काही दिग्गज नेते नाराज झाले होते. पक्षात केजरीवाल यांच्या एकप्रकारच्या हुकूमशाहीचाही निवडणुकीत फटका बसला आहे. दुसरीकडे, भाजपची तगडी यंत्रणा होती. भाजपच्या सूक्ष्म नियोजनासमोर आपचा टिकाव लागणारच नव्हता. झालेही तसेच. भाजपने (BJP) बूथस्तरापर्यंत आपली यंत्रणा कार्यरत केली होती.

अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री भाजपच्या प्रचारासाठी सक्रिय झाले होते. त्यामुळे भाजपसाठी वातावरणनिर्मिती झाली. असे सांगितले जाते, की दलित, मुस्लिम मतदारांमध्येही भाजपने विश्वास निर्माण केला होता. केजरीवाल आणि आप यांच्या दिखाऊ प्रेमाची कल्पना दलित, मुस्लिमांना आधीच आली होती. त्याचा फायदा भाजपला झाला.

Rahul Gandhi, Arvind Kejriwal
Delhi Election Results 2025 : 'या' 5 कारणांमुळे दिल्लीत कमळ फुललं! 'झाडू'ची जादू फेल अन् काँग्रेसचा सुपडासाफ

इंडिया आघाडी दिल्लीच्या निवडणुकीत विस्कळीत झाली होती. काँग्रेसला दुर्लक्षित करण्याची चूक आपला भोवल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस पक्ष या निवडणुकीत स्वतंत्र लढला. दलित, मुस्लिमांची मते मोठ्या प्रमाणात विभाजित झाली. ती काँग्रेसकडे आणि काही प्रमाणात भाजपकडेही गेल्याचे दिसून येत आहे.

अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या नेत्यांची आकांडतांडव करण्याची, नाकाने कांदे सोलण्याची वृत्ती मतदारांनी नाकारली आहे. या मतदारांना भाजपने भक्कम आणि सक्षम पर्याय दिला. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. कथित भ्रष्टाचाराचे आरोप करून केजरीवाल यांनी केंद्रातील काँग्रेसची सत्ता घालवली होती, तशाच आरोपांवरून आता त्यांना पायउतार व्हावे लागत आहे.

Editeded By - Jagdish Patil

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com