Bjp Lok Sabha Candidate : भाजपचा पुन्हा मास्टरस्ट्रोक; हेमामालिनी, स्मृती इराणी, बांसुरी स्वराज यांच्यासह 28 महिलांना उमेदवारी

Political News : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना अमेठी मतदारसंघातून, तर माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज यांना मध्य दिल्लीतून उमेदवारी देण्यात आली आहे.
Hema Malini, Smruti Irani, Basuri swaraj
Hema Malini, Smruti Irani, Basuri swarajSarkarnama
Published on
Updated on

Bjp News : लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपने देशभरातील 16 राज्यांतील 195 उमेदवारांची घोषणा करीत बाजी मारली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

या पहिल्या यादीत राज्यसभेसाठी उमेदवारी नाकारलेल्या अभिनेत्री हेमामालिनी यांना उत्तर प्रदेशातील मथुरा येथून, तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना अमेठी मतदारसंघातून तर माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज यांना मध्य दिल्लीतून उमेदवारी दिली आहे. (Bjp Lok Sabha Candidate News)

Hema Malini, Smruti Irani, Basuri swaraj
Anil Desai News : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अनिल देसाईंना बजावले समन्स; 'हे' आहे कारण

भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत 195 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीतील नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत 28 महिलांचा समावेश आहे.

डुमरियागंजमधून जगदंबिका पाल, फतेहपूरमधून साध्वी निरंजन ज्योती, टेहरी गढवालमधून माला राज्य लक्ष्मी शाह, धोरहरामधून रेखा शर्मा, लालगंजमधून नीलम सोनकर, मालदा दक्षिणमधून श्रीरूपा मित्रा चौधरी, गुगलीमधून लॉकेट चॅटर्जी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिल्लीतल्या लोकसभेच्या आठपैकी पाच जागांवर भाजपने (Bjp) त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. प्रवीण खंडेलवाल यांना चांदणी चौकातून, मनोज तिवारींना उत्तर-पूर्व दिल्ली, बांसुरी स्वराज (basuri Swaraj) यांना मध्य दिल्ली, कमलकित सहरावत यांना पश्चिम दिल्ली आणि रामवीर बिधुडी यांना दक्षिण दिल्लीतून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे.

R

Hema Malini, Smruti Irani, Basuri swaraj
BJPs first list of Lok Sabha Election : भाजपकडून लोकसभेसाठी 195 उमेदवारांच्या पहिल्या यादीत 'Social Engineering'वर भर!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com