BJPs first list of Lok Sabha Election : भाजपकडून लोकसभेसाठी 195 उमेदवारांच्या पहिल्या यादीत 'Social Engineering'वर भर!

Loksabha Election 2024 : महिला, तरुणांसह समाजीतील सर्व वर्गांमधून उमेदवार देण्याचा केला प्रयत्न; जाणून घ्या किती आहे प्रमाण
Lok Sabha Election 2024 : Narendra Modi Latest News :
Lok Sabha Election 2024 : Narendra Modi Latest News :Sarkarnama
Published on
Updated on

BJP and Loksabha Election 2024 News : भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी देशभरातील 16 राज्यांतील 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेत, याबाबत सविस्तर माहिती दिली आणि उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.

या वेळी विनोद तावडे यांनी भाजपकडून सर्व समाजांना न्याय देण्याचा प्रयत्न झाला असल्याचे सांगितले. शिवाय, जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल, असा विश्वासही व्यक्त केला. भाजपच्या पहिल्या यादीत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, स्मृती इराणी, शिवराज सिंह चौहान यांच्यासह दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election 2024 : Narendra Modi Latest News :
Loksabha Election 2024 : पंतप्रधान मोदी वाराणसीमधून निवडणूक लढवणार; भाजपची 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

पत्रकार परिषदेत माहिती देताना विनोद तावडे यांनी सांगितले, 'पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे यंदा लोकसभा निवडणुकीत भाजप 370 आणि एनडीए 400 पारचा संकल्प घेऊन देशवासीयांच्या समोर जावे. मागील काही दिवसांपासून आम्ही उद्दिष्ट हे ठेवलं आहे की, भौगोलिक क्षेत्रातही आम्ही वाढलो, राज्यांमध्येही आम्ही वाढलो. सोबतच एनडीएचाही विस्तार करण्याचा प्रयत्न मागील काही दिवसांमध्ये आम्ही केले आहेत. जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने पुन्हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकार बनेल, असा आम्हाला विश्वास आहे.'

'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत 16 राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशपैकी 195 जागांबाबत निर्णय झाला. महिला- 28, तरुण उमेदवार- 47, अनुसूचित जाती - 27, अनुसूचित जनजाती - 18, मागासवर्ग (ओबीसी)-57 अशाप्रकारे समाजातील सर्व वर्गांना सर्व समाजांना, जातींना प्रतिनिधित्व या पहिल्या यादीत दिलं गेलं.'

Lok Sabha Election 2024 : Narendra Modi Latest News :
BJP Lok Sabha Candidate First List : 'मिशन 45'चा दावा, पण भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्राला स्थानच नाही

भाजपच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) वाराणसी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गांधीनगर, मध्य प्रदेशातील गुनामधून ज्योतिरादित्य शिंदे, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान-विदिशा, लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला-कोटा, श्रीपाद नाईक उत्तर गोव्यातून अशा काही प्रमुख नेत्यांच्या उमेदवारीवर पहिल्या यादीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com