Manipur : भाजपचा जेडीयूला धोबीपछाड, पाच आमदार सोडणार पक्ष

Manipur News : भाजपने पैशाच्या बळाचा वापर केल्याचा आरोप..
Nitish Kumar & Amit Shaha
Nitish Kumar & Amit ShahaSarkarnama

मणिपूर : अलीकडेच बिहारमध्ये मुख्यमंत्री व जनता दल युनायटेचे ( JDU ) नेते नितीश कुमार यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत, ​​महाआघाडीसोबत सरकार स्थापन केले. मात्र यावेळी ईशान्येतील मणिपूरमध्ये मात्र भाजपने नितीश कुमार ( NITISH KUMAR ) यांना जोरदार दणका दिला आहे. जेडीयूच्या 6 पैकी 5 आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. मणिपूर विधानसभा निवडणुकीत जेडीयूने 38 पैकी सहा जागा जिंकल्या होत्या. आता त्यांच्याकडे केवळ एकच आमदार राहिला आहे. ( LATEST MARATHI NEWS )

मणिपूरमध्ये भाजपात सामील झालेल्या आमदारांची नावे न्गुरसंगलूर, एमएम खोटे, खुमुक्कम सिंग, अछाब उद्दीन आणि थंजाम अरुण कुमार अशी आहेत. विधानसभा अध्यक्षांनीही या पाच आमदारांना भाजपमध्ये प्रवेश करण्यास मान्यता दिली आहे. जेडीयूला दुसऱ्यांदा धक्का बसला आहे. जेडीयूचे आमदार टेको कासो यांनी २५ ऑगस्ट रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी, त्यांचा भाजपमध्ये समावेश केला होता.

Nitish Kumar & Amit Shaha
फडणवीस आणि माझी दुश्मनी थोडीचंय, भेटीत राजकीय चर्चा नाही : चव्हाणांचा खुलासा

जेडीयूचे प्रवक्ते आणि माजी मंत्री नीरज कुमार म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल. मणिपूरमध्ये आमदारांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राजकीय उलथापालथ झाली आहे. जेडीयू प्रमुख राजीव रंजन लालन सिंह यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. "मणिपूरमध्ये जे काही घडले, ते भाजपने पैशाच्या बळाचा वापर करून साध्य केले," असा आरोप त्यांनी भाजपवर केला आहे. तसेच, जेडीयू 2023 पर्यंत राष्ट्रीय पक्ष बनेल, असा दावाही त्यांनी केला.

Nitish Kumar & Amit Shaha
Dhule: धुळे महापालिकेच्या सभेत उर्दू घराच्या जागेवर वाद!

जेडीयूचे नेते उपेंद्र कुशवाह म्हणाले की, भाजप सातत्याने आमच्या पक्षाला बरबाद करण्याचा प्रयत्न करत आहे. एनडीएसोबत असताना आम्हाला ते जाणवले. आणि आज ते सिद्ध देखील झाले आहे. आज आम्ही त्यांच्या विरोधात आहोत, त्यामुळे त्यांचे हल्ले वाढतील, पण त्यांचा सामना करण्यास आम्ही तयार आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com