Dhule: धुळे महापालिकेच्या सभेत उर्दू घराच्या जागेवर वाद!

शोध घेऊन कार्यवाहीसाठी समिती नेण्याचा निर्णय महापौर कर्पेंकडून जाहीर
Dhule Corporation Meeting
Dhule Corporation MeetingSarkarnama
Published on
Updated on

धुळे : महापालिकेच्या (Dhule Corporation) महासभेत उर्दू घर योजनेसाठी जागेच्या विषयावरून सत्ताधारी- विरोधक, असा सामनाही पाहायला मिळाला. महापालिका (Dhule city) शाळा क्रमांक २५ च्या जागेवर उर्दू घर उभारण्याच्या विषयावर सत्ताधारी भाजप- (BJP) विरोधी सदस्यांमध्ये वाद झाले. (Urdu ghar scheme declaired by mayor Pradeep Karpe)

Dhule Corporation Meeting
Dhule News: भाजप म्हणते, साक्रीत ओला दुष्काळ जाहीर करा!‌

शासनाची योजना असल्याने उर्दू घरासाठी शासनाची जागा घ्यावी, असे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे होते, तर यासाठी उर्दू शाळेची जागा द्यावी, अशी अल्पसंख्याक नगरसेवकांचे म्हणणे होते. यावरून अल्पसंख्याक भागातील काही नगरसेवकांनी सभात्याग केला. सभागृहात ठिय्या मांडून ही मागणी लावून धरली. शेवटी उर्दू घरासाठी अल्पसंख्याक भागात जागेचा शोध घेण्याचे, समिती नेमण्याचे महापौर प्रदीप कर्पे यांनी सांगितले.

Dhule Corporation Meeting
Ashish Shelar : "तुम्हाला "पेग्विन सेना " म्हणायचे का ? ; ठाकरेंच्या 'कमळाबाई' टीकेला शेलारांचं प्रत्युत्तर

आरक्षणाचे काय : बैसाणे

महापालिकेतील मानधनावरील कनिष्ठ अभियंत्यांना मंजूर व रिक्त पदांवर सामावून घेण्याचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्याच्या विषयावर सदस्य सुनील बैसाणे यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून विरोध केला. एससी, एसटी, ओबीसी, अस्पसंख्याक आदींसाठी आरक्षण नसेल तर त्यांच्यावर अन्याय होईल. शिवाय कर्मचाऱ्यांच्या पगाराचे दायित्व घेणार का, असा सवाल केला व याप्रश्‍नी न्यायालयात जाईन, असा इशाराही दिला. शेवटी कायदेशीर बाबी तपासून, नियमानुसार शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यास मंजुरी देण्यात आली.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com