गुजरात निवडणूक प्रचारासाठी सार्वजनिक निधीचा गैरवापर; भाजपचा आप'वर गंभीर आरोप

Gujrat Election 2022| भाजपने आपवर “सार्वजनिक निधीचा खुलेआम गैरवापर” केल्याचा आरोप केला.
Arvind Kejariwali | Amit malviy
Arvind Kejariwali | Amit malviy

Gujrat Elelction अहमदाबाद : आगामी गुजरात विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि आपकडून मोठी तयारी सुरु करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंकडून मोठमोठी आश्वासने दिली जात आहेत. असे असताना आता भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी आम आदमी पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. आम आदमी पार्टीच्या पंजाब सरकारने गेल्या महिन्यात केवळ फेसबुकवरील जाहिरातींसाठी दोन कोटी रुपये खर्च केले असून त्यातील 69 टक्के एकट्या गुजरातसाठी खर्च केल्याचा आरोप मालवीय यांनी केला आहे.

भाजपने आम आदमी पक्षावर (आप) “सार्वजनिक निधीचा खुलेआम गैरवापर” केल्याचा आरोप केला. गेल्या महिन्यात, आप'च्या पंजाब सरकारने फेसबुक जाहिरातींवर 2.27 कोटी रुपये खर्च केले, त्यापैकी 1.58 कोटी रुपये, सुमारे 69 टक्के, गुजरातमधील प्रचारासाठी खर्च केल्याचा दावा अमित मालवीय यांनी केला आहे.

Arvind Kejariwali | Amit malviy
पारडीचा पूल कोसळला, पण तडा नितीन गडकरींच्या प्रतिमेला गेला...

आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरुन मालवीय यांनी ट्विट करत लिहीले आहे की, "गेल्या एका महिन्यात आप संचालित पंजाब सरकारने फेसबुक जाहिरातींवर 2.27 कोटी खर्च केले आहेत, त्यापैकी तब्बल 1.58 कोटी म्हणजे जवळपास 69%, गुजरातसाठी खर्च केले आहे! केजरीवाल यांच्या गुजरात प्रचारासाठी पंजाबमधील लोकांना पैसे का दिले जात आहेत? असा सवाल मालवीय यांनी उपस्थित केला आहे. तसेच, सार्वजनिक निधीचा हा निर्लज्जपणे दुरुपयोग असल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.

गुजरात निवडणुकांच्या तोंडावर आपकडून मुख्यमंत्री पदाच्या चेहरा समोर आणण्यााठी सस्पेंस निर्माण केला जात आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही, राज्यातील जनतेने दिलेल्या कौलाच्या आधारे आप आपल्या मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्याचे नाव जाहीर करेल, असे म्हटले आहे.

केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाकडून एक दूरध्वनी क्रमांक जारी करण्यात आला आहे. यात , "जनतेचे मत जाणून घेण्यासाठी, आम्ही एक क्रमांक जारी करत आहोत - 6357000 360. तुम्ही एसएमएस, व्हॉट्सअॅप संदेश पाठवू शकता तसेच व्हॉईस मेल देखील सोडू शकता. आम्ही एक ई-मेल देखील जारी करत आहोत - aapnocm@gmail.com लोक त्यांच्या निवडी पाठवू शकतात. ३ नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ४ नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाईल.''असे म्हटले आहे.

Arvind Kejariwali | Amit malviy
Ravi Rana : फडणवीसांच्या भेटीनंतर राणांची दिलगिरी ; बच्चू कडू त्यांचे शब्द मागे घेतील का ?

विशेष म्हणजे 29 ऑक्टोबर रोजी गुजरातमधील नवसारी येथे केजरीवाल निवडणूक प्रचारासाठी बाहेर पडताच स्थानिक लोकांनी 'मोदी मोदी'च्या घोषणा देऊन त्यांचे स्वागत केले. मोठ्या संख्येने स्त्री-पुरुष आपच्या निमंत्रकांना काळे झेंडे दाखवत रस्त्यावर उतरले होते. तत्पूर्वी, 8 ऑक्टोबर रोजी रोड शो आणि 20 सप्टेंबर रोजी वडोदरा विमानतळावर केजरीवाल आणि त्यांचे सहकारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे 'मोदी-मोदी'च्या घोषणांनी स्वागत करण्यात आले.'''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com