पारडीचा पूल कोसळला, पण तडा नितीन गडकरींच्या प्रतिमेला गेला...

आधी असलेल्या रस्त्याचीही ऐसीतैसी झाली. त्यामुळे येथून जाणारा प्रत्येक वाहनधारक एनएचएआय आणि नितीन गडकरींचा Union Minister Nitin Gadkari ‘उद्धार’ केल्याशिवाय पुढे जात नाही, हे वास्तव आहे.
Union Minister Nitin Gadkari
Union Minister Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : नितीन गडकरी आपल्या वैविध्यपूर्ण कामांसाठी देशभरात ओळखले जातात. त्यांच्या हटके कामगिरीने लोकांनी त्यांचे आडनाव बदलवून ‘रोडकरी’ ठेवले आहे. आपल्या कामगिरीने आडनाव बदलणारे बहुधा देशातील ते एकमेव नेते असावे. अशा या बलाढ्य गडकरींची पारडीच्या पुलाने चांगलीच गोची केली आहे. अशक्य ते शक्य करून दाखवणारे नेते म्हणून त्यांची ख्याती आहे. परवा रात्री पूर्व नागपुरातील पारडी ते एचबी टाऊन दरम्यान उड्डाणपुलाचा एक भाग कोसळला आणि त्यामुळे गडकरींच्या प्रतिमेला चांगलाच तडा गेला.

विशेष म्हणजे २०१४ साली या उड्डाणपुलाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी प्रणालीने झाले होते. तेव्हा गडकरी भूपृष्ठ वाहतूकमंत्री होते. सात वर्षांत पारडी पुलाचे काम पूर्ण झाले नाही. त्यातच गर्डर पडल्याने नितीन गडकरी यांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. त्यांच्या कामांची प्रशंसा त्यांचे विरोधकही करतात. पण ही घटना घडताच विरोधकांच्या हाती आयते कोलीत लागले. अन् गडकरींच्या विरोधात नागपुरात आंदोलन उभे झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, पीरिपा, आप आधी पक्ष रस्त्यावर उतरले होते. पूर्व नागपुरातील लोकांसाठी हा पूल अत्यंत महत्वाचा आहे. पूर्व नागपुरातून शहराबाहेर पडण्यासाठी हा एकच मार्ग असल्याने येथे अवजड वाहनांची मोठी गर्दी होते. पूल पूर्ण झाल्यास लोकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. पण सात वर्षांपासून पूलही झाला नाही आणि आधी असलेल्या रस्त्याचीही ऐसीतैसी झाली. त्यामुळे येथून जाणारा प्रत्येक वाहनधारक एनएचएआय आणि नितीन गडकरींचा ‘उद्धार’ केल्याशिवाय पुढे जात नाही, हे वास्तव आहे.

मागील वर्ष खुद्द गडकरीच अडकले होते कोंडीत...

वर्षभरापूर्वी या मार्गाने जाताना पुलाखालीच गडकरी वाहतूक कोंडीत अडकले होते. त्यांनी स्वतः गाडीतून उतरून वाहतूक सुरळीत केली होती. लगेच त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावलेसुद्धा होते. त्यानंतरही पुलाच्या कामाला गती आली नाही. तत्पूर्वी, पुलाचे काम रेंगाळत ठेवल्याने भाजपच्या एका नगरसेवकाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना डांबून ठेवले होते. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे गडकरी प्रचंड संतापले होते. एका पाठोपाठ घटना घडत असतानाही पारडी उड्डाण पुलाचा कंत्राटदार मात्र फारसे गंभीरपणे लक्ष देत नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. आता तर पुलाचा एक मोठा भाग कोसळला. त्यामुळे आता गडकरी कुणाला खडसावतील, याची प्रतीक्षा नागपूरकरांना आहे.

कंत्राटदारांना नेहमीच देतात इशारे...

दोन-तीन महिन्यांपूर्वी वर्धा येथे एका पुलाच्या उद्घाटन समारंभासाठी गडकरी वर्धेला गेले होते. तेथे भाषण करताना त्यांनी ठेकेदाराला तंबी दिली होती. ‘रस्ता आणि पुलाचे काम झाल्यानंतरही झाडे लावण्याचे काम ठेकेदाराचेच आहे. त्यामुळे त्याने जर झाडे लावली नाहीत, तर मला सांगा. आपण त्यांचे पैसैच थांबवून टाकू. कारण आपण काही ठेकेदारांकडून पैसे खात नाही’, असे गडकरींनी वर्धेचे खासदार रामदास तडस यांना सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यावर तेव्हा सभेत चांगला हंशा पिकला होता. आता पारडी पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने तर कळसच केला. येवढा भ्रष्टाचार केला की पुलाचा ३० मीटरचा एक स्लॉट कोसळला. विशेष उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी या ठेकेदाराला खुद्द गडकरींनीच क्लिन चिट दिली आहे.

Union Minister Nitin Gadkari
प्रशासन म्हणते, थोडं थांबा... नितीन गडकरी यांची पूजा सुरू आहे!

चौकशीचा होणार केवळ देखावा..

अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा आणि कंत्राटदारांचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. ही घटना दुदैवी असून तत्काळ तपास करण्यात यावा. यात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश नितीन गडकरी यांनी दिले आहे. मात्र या चौकशीतून काही साध्य होणार नाही, अस विरोधक सांगत आहेत. चौकशी करणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आहेत आणि कंत्राटदार भाजपचा आहे. त्यामुळे गडकरी आणि कंत्राटदाराच्या विरोधात जाऊन अधिकारी चौकशी करतील, असे वाटत नाही. उड्डाणपुलासोबत खालच्या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण आणि वर मेट्रोचा पूल अशी तीन कामे सुमारे पाच वर्षांपासून येथे सुरू आहेत. पण यांतील एकही काम पूर्ण न झाल्याने जनता पार वैतागली आहे. येवढ्या वर्षांत अफाट कामे करून गडकरींनी मिळविलेल्या प्रतिमेला पारडीच्या पुलाने मात्र मोठा तडा गेला, हे निश्‍चित.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com