राहुल गांधींवर बॉलीवूड अभिनेत्री फिदा; म्हणाली, ऐतिहासिक भाषण!

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या संसदेतील भाषणावरून भाजपकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे.
Simi Garewal Statement on Rahul Gandhi's  Speech
Simi Garewal Statement on Rahul Gandhi's SpeechSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या संसदेतील भाषणावरून भाजपकडून (BJP) त्यांच्यावर टीका केली जात आहे. पाकिस्तान-चीन संबंध, दोन भारत आदी वक्तव्यांवरून भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. पाकिस्तान मुद्दयावर अमेरिकेनेही नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. पण काँग्रेसच्या (Congress) नेत्यांसह बॉलीवू़डची (Bollywood) अभिनेत्रीही या भाषणावर फिदा झाल्या आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना बुधवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेत मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार टीका केली. या भाषणाला प्रसिध्द अभिनेत्री सिमी गरेवाल (Simi Garewal) यांनी ऐतिहासिक भाषण म्हटले आहे. त्यांनी याबाबतचे ट्विट करून म्हटले आहे की, आज राहुल गांधी एका प्रखर नेत्याप्रमाणे पाहायला मिळाले. या ऐतिहासिक भाषणात देश त्यांचा आत्मविश्वास पाहू आणि ऐकू शकत होता, असं कौतुक गरेवाल यांनी केलं आहे.

Simi Garewal Statement on Rahul Gandhi's  Speech
राहुल गांधींच्या संसदेतील भाषणाची थेट अमेरिकेनं घेतली दखल

राहुल गांधी यांनी मांडलेल्या तथ्यांना देश ऐकू शकत होता आणि त्यांनी व्यक्त केलेल्या वास्तविक भीतीलाही. त्यांनी एक सच्चा राष्ट्रवादी आणि नेता असल्याचे दाखवून दिले, असेही गरेवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. काँग्रेसचे नेते पवन खेरा यांचे ट्विट रिट्विट करत अभिनेत्री पुजा भट यांनीही विश्वासार्ह, मुद्देसुद आणि प्रतिष्ठ जपणारे असं म्हणत भाषणाचे कौतुक केले आहे.

अमेरिकेकडून समर्थन नाही

राहुल गांधी यांनी भाषणादरम्यान म्हटलं होतं की, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे चीन (China) आणि पाकिस्तानला (Pakistan) एकत्र आणले जात आहे. भारतासमोर हे सर्वात मोठं आव्हान आहे. चीनजवळ स्पष्ट योजना असून त्याची पाया डोकलाम आणि लडाख आहे. हा देशासाठी धोका आहे. माझा सल्ला आहे, आता थांबा. तुम्ही धोक्याला हलक्यात घेऊ नका. काश्मीरबाबत सरकारने चुकीचे निर्णय घेतले आहेत.

चीन आणि पाकिस्तानबाबत राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावर अमेरिकेकडून प्रतिक्रिया आली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राईस म्हणाले, अशा प्रकारच्या वक्तव्यांचे आम्ही समर्थन करत नाही. मी हे पाकिस्तान आणि चीनवर सोडतो. त्यांनी आपल्या संबंधांबाबत सांगावे. आमचे पाकिस्तान सरकारशी चांगले संबंध आहेत. कोणत्याही देशाला अमेरिका आणि चीनपैका एका देशाची निवड करण्याची गरज नाही, हे आम्ही जगासमोर स्पष्ट केलं आहे. अमेरिकेशी संबंधांची चर्चा सुरू होते तेव्हा आमची त्या देशांना पर्याय देण्याची भूमिका असते, असंही प्राईस यांनी स्पष्ट केलं.

राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

आता दोन भारत तयार झाले आहेत. एक अतिशय श्रीमंतांचा भारत आहे आणि दुसरा गरीबांचा आहे. या दोन्ही भारतांच्या दरम्यानची दरी दिवसेंदिवस वाढत आहे. रोजगारासाठी उत्तर प्रदेश व बिहारमध्ये तरुणांनी जे आंदोलन झाले. त्याबद्दल कोणीच बोलत नाही. राष्ट्रपतींनी देखील त्यांच्या अभिभाषणात एक शब्दही उच्चारला नाही. गरीब भारताजवळ रोजगार नाही. मात्र, त्याबद्दल कोणीच बोलयाला तयार नाही. देशभरातील तरुण आज रोजगाराच्या शोधात आहेत. तरुणांना फक्त रोजगार हवा आहे. मात्र, मोदी सरकार त्यांना रोजगार देऊ शकत नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. यावेळी सत्ताधारी पक्षाने गोंधळ घातला असता केंद्र सरकारला टीका का सहन होत नाही का असा सवाल राहुल गांधी यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com