नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना बुधवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संसदेत (Parliament) मोदी सरकारवर जोरदार टीका केली. यादरम्यान त्यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणांवरही हल्लाबोल केला. या धोरणांमुळे पाकिस्तान आणि चीन जवळ आल्याची टीका त्यांनी केली. याची दखल थेट अमेरिकेने (America) घेतली असून त्यावर प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे. (America reacts on Rahul Gandhi's Speech)
राहुल गांधी यांनी भाषणादरम्यान म्हटलं होतं की, केंद्र सरकारच्या (Modi Government) धोरणांमुळे चीन आणि पाकिस्तानला एकत्र आणले जात आहे. भारतासमोर (India) हे सर्वात मोठं आव्हान आहे. चीनजवळ स्पष्ट योजना असून त्याची पाया डोकलाम आणि लडाख आहे. हा देशासाठी धोका आहे. माझा सल्ला आहे, आता थांबा. तुम्ही धोक्याला हलक्यात घेऊ नका. काश्मीरबाबत (Kashmir) सरकारने चुकीचे निर्णय घेतले आहेत.
चीन आणि पाकिस्तानबाबत राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावर अमेरिकेकडून प्रतिक्रिया आली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राईस म्हणाले, अशा प्रकारच्या वक्तव्यांचे आम्ही समर्थन करत नाही. मी हे पाकिस्तान आणि चीनवर सोडतो. त्यांनी आपल्या संबंधांबाबत सांगावे. आमचे पाकिस्तान सरकारशी चांगले संबंध आहेत. कोणत्याही देशाला अमेरिका आणि चीनपैका एका देशाची निवड करण्याची गरज नाही, हे आम्ही जगासमोर स्पष्ट केलं आहे. अमेरिकेशी संबंधांची चर्चा सुरू होते तेव्हा आमची त्या देशांना पर्याय देण्याची भूमिका असते, असंही प्राईस यांनी स्पष्ट केलं.
राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
आता दोन भारत तयार झाले आहेत. एक अतिशय श्रीमंतांचा भारत आहे आणि दुसरा गरीबांचा आहे. या दोन्ही भारतांच्या दरम्यानची दरी दिवसेंदिवस वाढत आहे. रोजगारासाठी उत्तर प्रदेश व बिहारमध्ये तरुणांनी जे आंदोलन झाले. त्याबद्दल कोणीच बोलत नाही. राष्ट्रपतींनी देखील त्यांच्या अभिभाषणात एक शब्दही उच्चारला नाही. गरीब भारताजवळ रोजगार नाही. मात्र, त्याबद्दल कोणीच बोलयाला तयार नाही. देशभरातील तरुण आज रोजगाराच्या शोधात आहेत. तरुणांना फक्त रोजगार हवा आहे. मात्र, मोदी सरकार त्यांना रोजगार देऊ शकत नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. यावेळी सत्ताधारी पक्षाने गोंधळ घातला असता केंद्र सरकारला टीका का सहन होत नाही का असा सवाल राहुल गांधी यांनी केला.
गेल्या वर्षभरात ३ कोटी तरुणांचा रोजगार गेला आहे. तुम्ही मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडियाबद्दल बोलत आहात. मात्र, देशातील रोजगाराची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, तरीही तुम्ही आपल्या भाषणात त्याबद्दल काहीच बोलला नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले. किती रोजगार निर्माण करण्यात आला, किती जणांना रोजगार दिला, अशा प्रश्नाची सबत्तीच त्यांनी केंद्र सरकारवर केली. रोजगारा बाबत तुम्ही काहीच माहिती दिली नाही. कारण या बद्दल तुम्ही बोलाल तर तरुण तुमच्याकडे पाहून तुम्ही मजाक करत आहात असे म्हणेल, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भाजपचा समाचार घेतला.
दोन भारत कसे निर्माण झाले, असा सवाल करत राहुल गांधी म्हणाले, रोजगार, लघू आणि मध्यम उद्योग, असंघटीत क्षेत्रात याची निर्मिती झाली. या क्षेत्रातून कोट्यवधी रुपये हिसकावून घेत तुम्ही देशातल्या मोजक्या श्रीमंतांना दिले आहेत. गेल्या सात वर्षात तुम्ही लघू आणि मध्यम उद्योगांवर आक्रमण केले. नोटाबंदी, त्यापाठोपाठ जीएसटी आणि कोरोनाकाळात त्यांना तुम्ही कोणतीच मदत केली नाही, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. छोटे उद्योग तुम्ही मारून टाकलेत, त्यामुळे मेड इन इंडिया होऊच शकत नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.