PM Modi news: पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत पुन्हा ढिसाळपणा; सुरक्षा कडं भेदून तरुण थेट ताफ्यात घुसला अन्...

कर्नाटकातील दावणगिरी येथे आयोजित निवडणूक रॅलीदरम्यान ही घटना घडल्याची माहिती आहे.
PM Modi news:
PM Modi news:Sarkarnama
Published on
Updated on

PM Modi news : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षा भेदून एक तरुण थेट त्यांच्या ताफ्यात पोहचल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकातील दावणगिरी येथे आयोजित निवडणूक रॅलीदरम्यान ही घटना घडल्याची माहिती आहे. पण पंतप्रधानांच्या जवळ जाण्यापूर्वीच सुरक्षा रक्षकांनी त्यांला ताब्यात घेतल्याने पुढील धोका टळला. (Breaking through Prime Minister Modi's security, the young man directly entered the convoy and...)

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही दुसरी चूक आहे. कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या राज्यव्यापी 'विजय संकल्प यात्रे'निमित्त पंतप्रधानांनी दावणगिगरीत जाहीर सभेला संबोधित केले. त्यानंतर पंतप्रधान रोड शो करत असताना अचानक एक व्यक्ती त्यांच्या गाडीसमोर धावत आला. तो कारच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण तितक्यात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

PM Modi news:
Eknath Shinde News: ''बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी अमित शाहांना...''; मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात एक माणूस मोदींच्या मोटारीकडे जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने सुरक्षा कडे ओलांडल्याचे दिसत आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी जानेवारीत पी. एम. मोदींच्या पंजाब दौर्‍यादरम्यान त्यांच्या सुरक्षेचा भंग झाला होता. फिरोजपूरमध्ये आंदोलकांनी त्यांच्या रस्ता अडवल्यामुळे पंतप्रधानांचा ताफा उड्डाणपुलावर अडकला होता. त्यानंतर ते पंजाबमधील त्यांच्या रॅलीसह कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित न राहता परतले.

या प्रकरणी अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) कायदा आणि सुव्यवस्था आलोक कुमार यांनी ट्विट केले आहे. “हा एक अयशस्वी प्रयत्न होता. मी आणि स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने (SPG) ताबडतोब सुरक्षित अंतरावर पकडले. या संदर्भात योग्य ती कारवाई केली जात आहे.” तर जिल्हा पोलिसांनी सुरक्षेत कोणतीही त्रुटी असल्याचे नाकारले. श्री. कुमार म्हणाले, "आज दावणगेरेमध्ये माननीय पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये कोणतेही उल्लंघन झाले नाही." असे त्यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com