PM Narendra Modi: BRICS च्या विस्ताराची घोषणा; नव्या सहा देशांचा होणार समावेश, मोदींनी केले स्वागत!

PM Narendra Modi In BRICS Summit - "भारताचे या नव्या सदस्य देशांशी चांगले संबंध आहेत.'
BRICS
BRICSSarkarnama
Published on
Updated on

BRICS Summit In South Africa : ब्रिक्स देशांच्या संघटनेत आणखी सहा नव्या सदस्य देशांचा सहभाग होण्याची घोष. नव्या सहा देशांना ब्रिक्स संघटनेकडून निमंत्रण देण्यात आले आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका दक्षिण या देशांनी एकत्र येत नव्या ब्रिक्स संघटनेची स्थापना केली आहे. आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे तीन दिवसीय ब्रिक्सच्या शिखर परिषदेत चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. ब्रिक्स देश संघटनेचा विस्तारही करू पाहत आहेत, त्याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नव्या सहा देशांचे स्वागत केले आहे. (Latest Marathi News)

BRICS
Congratulate Narendra Modi : शेतमालाचे भाव गडगडले; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अभिनंदनाचा चक्क 'फ्लेक्स'च लागला

दक्षिण आफ्रिकचे राष्ट्रपति सिरिल रामफोसा म्हणाले की, विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांना ब्रिक्समध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. नवीन सदस्य देशांचा समावेश 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहे.

पंतप्रधान मोदींनी स्वागत केले -

पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले, "मी नवीन सदस्य होऊ पाहणाऱ्या देशांच्या सर्व नेत्यांचे आणि नागरिकांचे अभिनंदन करतो. एकत्रितपणे आपण ब्रिक्सला नवी गती देऊ. भारताचे या नव्या सदस्य देशांशी चांगले संबंध आहेत. यापुढे ब्रिक्सच्या माध्यमातून हे संबंध अधिक दृढ होतील."

चांद्रयानाबद्दल भारताचं अभिनंदन -

यावेळी ब्रिक्समध्ये चांद्रयानच्या यशाचाही उल्लेख केला गेला. चांद्रयानाबद्दल सर्व देशांकडून मिळणाऱ्या शुभेच्छांबद्दल नरेंद्र मोदींनी आभार मानले. ते म्हणाले की, चांद्रयान ज्या ठिकाणी उतरले ते अतिशय अवघड क्षेत्र आहे. मिळालेल्या यशाबद्दल मी वैज्ञानिकांचे आभार मानतो.

BRICS
Sugar Export News : कांद्यानंतर मोदी सरकार आता साखरेतून मतपेरणीच्या तयारीत ?

दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष रामाफोसांनी केले अभिनंदन -

"चांद्रयानाच्या यशस्वी लँडींगबद्दल दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष रामाफोसांनी भारताचे अभिनंदन केले. रामाफोसा पुढे म्हणाले, “या परिषेदेमुळे देशा-देशांमधील देवाणघेवाण, मैत्री आणि सहकार्य वाढवले. ज्यात जागतिक आर्थिक आणि राजकीय मुद्द्यांवर महत्त्वाच्या बाबींवरचर्चा झाली. ब्रिक्सच्या माध्यमातून पाच देशांचे सहकार्य वाढत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com