भाजपकडून मायावतींना राष्ट्रपती पदाची ऑफर? बसपाची कार्यकारणी बरखास्त

मायावतींनी सर्व कार्यकारणी बरखास्त केली असून पक्षाच्या निरीक्षकांची नेमणूक केली आहे.
mayawati
mayawatisarkarnama
Published on
Updated on

लखनऊ : विधानसभा निवडणुकीच्या दारुण पराभवानंतर बहुजन समाजवादी पार्टीच्या (bsp)प्रमुख, माजी मुख्यमंत्री मायावती (mayawati)यांनी रविवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत उत्तर प्रदेश निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. यावेळी मायावतींनी उत्तर प्रदेशसह सर्व कार्यकारणी बरखास्त करून टाकली. फक्त प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना सध्या तरी पदावर कायम ठेवले आहे. (mayawati news update)

काही दिवसापासून बसपाच्या प्रमुख मायावतींना राष्ट्रपती पदाची ऑफर देण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. याबाबत मायावतींनी बैठकीत स्पष्टीकरण दिले. ''भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या काही दिवसापासून बसपाच्या समर्थकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत,''

mayawati
मुख्यमंत्री ठाकरेंवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकाला शिवसैनिकांकडून चोप

''राष्ट्रपतीपदाची ऑफर मी स्वीकारणे म्हणजे स्वतःच्याच बहुजन समाज पार्टीचा अंत घडवून आणणे होय. त्यामुळे अशी कोणतीही ऑफर मला आलेली नाही आणि ती मी स्वीकारणार नाही,'' असे मायावती यांनी सांगितले.

''मला राष्ट्रपतीची ऑफर कोणीही दिली नाही,'' असे मायावती म्हणाल्या. हा भाजपचा डाव असल्याचे त्यांनी सांगितले. ''जर उत्तरप्रदेशात भाजपला निवडून दिले तर मायावतींनी राष्ट्रपती करण्यात येईल,'' अशी अफवा पसरली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

mayawati
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ला

''भविष्यात संघटनात्मक बांधणी करण्याच्या दृष्टीने संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त केली आहे. पक्षाच्या निरीक्षकांची नेमणूक केली आहे. ते उत्तर प्रदेश मधल्या जिल्ह्याजिल्ह्यामध्ये जाऊन फक्त संघटनेचा आढावा घेतील आणि पराभवाची कारणमीमांसा करतील,'' असे मायावतींनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com