बिहार : स्वातंत्र्य लढ्यातील सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar)यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. नितीश कुमार या हल्ल्यातून बचावले असून त्यांना कुठलीही दुखापत झालेली नाही.
बिहारमधील बख्तियारपूरमध्ये ही घटना घडली. बख्तियारपूर मार्केट परिसरातून मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा ताफा जात होता. यावेळी त्यांना भेटण्यासाठी येथील नागरिकांनी रस्त्यावर दोन्ही बाजूला एकच गर्दी केली होती. नागरिकांना भेटण्यासाठी नितीश कुमार यांनी आपली गाडी थांबवली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
त्यांनतर येथील रॅलीला मागर्दर्शन करण्यासाठी नितीश कुमार निघाले. ते व्यासपीठावर आले अन् अचानक एका अज्ञात तरुणाने त्यांच्या पाठीवर बुक्की मारण्याचा प्रयत्न केला. नितीश कुमार यांच्या बाजूला असलेल्या सुरक्षारक्षकांची त्या तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.
ही सर्व ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली आहे. हल्लेखोर मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे समजते. अद्याप त्याचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. नितीश कुमार यांच्यावरील या हल्ल्याचे कारण कळले नसून पोलीस त्या तरुणाची चौकशी करत आहेत. बख्तियारपूर परिसरातच नितीश कुमार यांचे बालपण गेलं आहे. या शहराशी त्याचे जवळचं नातं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.