मोठी बातमी : सांस्कृतिक मंत्री आज भाजपमध्ये प्रवेश करणार

स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे या प्रवेशात अडचण निर्माण झाली होती.
Govind Gaude
Govind GaudeSarkarnama
Published on
Updated on

पणजी : गोव्यात (Goa) विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला (BJP) धक्के बसत आहेत. यामुळे भाजपने सांस्कृतिक मंत्री व अपक्ष आमदार गोविंद गावडे (Govidn Gaude) यांच्यासाठी गळ टाकला होता. पण स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे या प्रवेशात अडचण निर्माण झाली होती. अखेर भाजप नेतृत्वाच्या मध्यस्थीनंतर गावडेंच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त निघाला आहे.

गावडे हे अपक्ष आमदार असले तरी सरकारमध्ये मंत्री आहेत. ते भाजपमध्ये प्रवेश करतील, असे पक्ष नेतृत्वानेच जाहीर केले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंदशेट तानवडे यांनी गावडे हे भाजपमध्ये प्रवेश करतील आणि त्यांना प्रियोळ मतदारसंघातून उमेदवारी देण्याची घोषणा केली होती. या घोषणेमुळे स्थानिक नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. गावडेंना तिकिट दिल्यास स्थानिक उमेदवार विरोधात देण्याचा इशारा दिला होता.

Govind Gaude
ओमिक्रॉनला छोटा कोरोना म्हणणारे मेक्सिकोचे अध्यक्ष 24 तासांतच पॉझिटिव्ह

अखेर गावडे यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मुहूर्त निश्चित झाला आहे. त्यांना पक्षांतर्गत नाराजीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला होता. त्यामुळे त्यांनी भाजप प्रवेश लांबवणीवर टाकला होता. आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. याबद्दल बोलताना गावडे म्हणाले की, आज दुपारी 3 वाजता मी आमदारकीचा राजीनामा देणार आहे. त्यानंतर 4 वाजता मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

Govind Gaude
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनचा जगाला आठवडाभरात दुसरा धक्का

दरम्यान, भाजपला सोडचिठ्ठी देणाऱ्या आमदारांची संख्या चारवर गेली आहे. भाजपमधील गळती थांबत नसल्याने पक्ष नेतृत्व धास्तावले आहे. गोव्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आहे. विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या धामधुमीत भाजपला गळती लागली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि घनकचरा व्यवस्थापन खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यानंतर काही तासांतच मये मतदारसंघातील आमदार प्रवीण झांटे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्याआधी कार्लोस अल्मेडा आणि अलिना सलडान्हा यांनी भाजपला रामराम केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com