Nirmla Sitaraman
Nirmla SitaramanSarkarnama

आयकर विभागाचा छापा पडलाच तर आता जपून राहा, कारण...

Budget 2022-2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मांडला देशाचा अर्थसंकल्प...
Published on

नवी दिल्ली : देशात आता प्राप्तिकर अर्थात आयकर विभागाचा छापा पडलाच तर जपून राहवं लागणार आहे. कारण छाप्यात जर कर चुकवेगिरी केलेली रक्कम सापडली तर त्यावर सेट-ऑफ मिळणार नाही. म्हणजे काय तर यापूर्वी १० कोटी रुपये कर चुकवलेली रक्कम सापडल्यास त्यावर सरकार सेटलमेंट करुन केवळ कर चुकवलेली ३० टक्के रक्कम म्हणजेच ३ कोटी रुपये वसूल करत असे. मात्र आता सरकार ३ कोटी वसूल न करता सर्वच्या सर्व १० कोटी रुपयेच जप्त करणार आहे. त्यामुळे एकदा कर चुकवलेली रक्कम जप्त झाल्यास त्यातील १ रुपया देखील परत मिळणार नाही.

कोरोना काळात आर्थिक चणचणतेचा आणि आजारपणाशी लढलेल्यांप्रती संवेदना व्यक्त करत अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmla Sitaraman) यांनी २०२२-२०२३ च्या अर्थसंकल्पाला (Budget 2022-2023) सुरुवात केली. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प असून केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचा अर्थमंत्री म्हणून चौथा अर्थसंकल्प आहे. २०१४ पासून सर्व नागरिकांचे कल्याण करणे आणि त्यांना बळ देणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सीतारमन यांनी सांगितले.

Nirmla Sitaraman
मोबाईल, चप्पलपासून ते शेतीच्या सामानापर्यंत अनेक गोष्टी स्वस्त होणार

आजच्या अर्थसंकल्पातून अनेक गोष्टी स्वस्त होणार :

आजच्या अर्थसंकल्पात अनेक गोष्टी स्वस्त होणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केली आहे. यात मोबाईल फोन, चार्जर स्वस्त होणार आहे. शिवाय चमड्याच्या वस्तू देखील स्वस्त होणार आहेत. त्यामुळे आता चप्पल-बूटांच्या किमती कमी होणार आहेत. याशिवाय शेतीसाठी लागणारे सामान देखील स्वस्त होणार आहेत. कपडे आणि परदेशातून येणारी मशिन्स स्वस्त होणार. आजच्या अर्थसंकल्पानंतर हिऱ्यांचे दागिनेही स्वस्त होणार आहेत.

Nirmla Sitaraman
Union Budget 2022 : गोदावरी-कृष्णेसह पाच नदीजोड प्रकल्पांना मिळणार गती

अर्थसंकल्पात हमीभावासाठी मोठी घोषणा :

आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या बहुप्रतिक्षित हमीभावाबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. सरकारने शेतकऱ्यांची हमीभावाची मागणी लक्षात घेत त्यासाठी २.७ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पीकाचे योग्य मुल्य देण्यासाठी मदत होणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमन म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com