Union Budget 2022 : गोदावरी-कृष्णेसह पाच नदीजोड प्रकल्पांना मिळणार गती

अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. पुढील तीन वर्षात तब्बल 400 वंदे भारत रेल्वे धावणार आहे.
River
RiverSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी अर्थसंक्लप सादर करताना पाच नदीजोड प्रकल्पांची घोषणा केली आहे. या नदीजोड प्रकल्पांचे डीपीआर (डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट) चा आराखडा अंतिम करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पांचे काम आता मार्गी लागणार आहे. त्यामुळे गोदावरी-कृष्णा नदीजोड प्रकल्पाचाही समावेश आहे. (Union Budget 2022)

पाच प्रकल्पांमध्ये गोदावरी-कृष्णेसह दमण गंगा-पिंजाळ, तापी-नर्मदा, कृष्णा-पेन्नार आणि पेन्नार-कावेरी या प्रकल्पांचा समावेश आहे. गोदावरी-कृष्णा प्रकल्पाबाबत मागील काही वर्षांपासून चर्चा सुरू आहे. दरम्यान, अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. पुढील तीन वर्षात तब्बल 400 वंदे भारत रेल्वे धावणार आहे. पुढील तीन वर्षात रेल्वे अधिक मॉडर्न करण्याच्यादृष्टीने केंद्रानं हे पाऊल टाकले मानले जात आहे. त्याचप्रमाणे गरज आणि स्थानिक परिस्थितीनुसार देशभरात मेर्टोचे जाळेही उभारले जाणार आहे. (Union Budget 2022 Live Updates)

River
Union Budget 2022 : अर्थमंत्र्याची रेल्वेबाबत पहिली मोठी घोषणा...

येत्या आर्थिक वर्षापासून ई-पासपोर्टही दिले जाणार आहेत. त्यामुळे परदेशी प्रवास करणाऱ्यांची मोठी सोय होणार आहे. पीएम गतीशक्ती प्रकल्पाचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. यामध्ये पायाभुत सुविधा विकसित करण्याबरोबरच यामाध्यमातून युवकांनाही रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. देशात पीपीपी तत्वावर चार ल़ॉजिस्टिक पार्क उभारण्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे. वन रेल्वे स्टेशन, वन प्रोडक्ट या योजनेची अंमलबजावणी करत स्थानिकांना प्रोत्साहन दिले जाईल. पुढील वर्षभरात देशातील 60 किलोमीटर आठ रोपवे उभारले जाणार आहेत. शाश्वत विकासालाही सरकारचे प्राधान्य राहणार असल्याचे सांगत अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठीही महत्वाच्या घोषणा केल्या झिरो बजेट शेती, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर आदी मुद्यांचा त्यांनी उल्लेख केला.

२०२२-२०२३ च्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे : (Union Budget 2022 Highlights)

- पुढच्या ५ वर्षात ५० लाख नोकऱ्या कशा निर्माण करता येतील यासाठी आम्ही प्रयत्नशील.

- आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्याला प्राधान्य दिले जाईल. लसीकरणावर सरकारचा अधिक भर.

- महिला, शेतकरी, तरुण वर्ग यांना कसा फायदा होईल यासाठी आम्ही प्रयत्न केले.

- नवीन आणि आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर देखील महत्वाचे आहे, त्यासाठी देखील आम्ही कटिबद्ध आहोत.

- गोदावरी-कृष्णा नदीजोड प्रकल्पासह पाच प्रकल्पांच्या डीपीआरला मंजूरी

- LIC चा आयपीओ लवकरच येणार.

- येत्या आर्थिक वर्षापासून ई-पासपोर्ट मिळणार

- पंतप्रधान गतीशक्ती योजनेतून पायाभूत सुविधांवर सरकारचा भर.

- खासगी गुंतवणूक वाढवण्यावर तसंच दळणवळणाची साधने वाढवण्यावर भर देण्यात येईल.

- २०२० ते २०२३ या काळात नॅशनल महामार्गांचे जाळे २५ हजार किमीवर नेणार.

- रेल्वे आणि रस्ते निर्माणासाठी मोठी गुंतवणूक.

- जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांवर भर

- ४०० नव्या आणि आधुनिक दर्जाच्या वंदे भारत रेल्वे विकसीत करणार.

- नवीन शहरांमध्ये मेट्रो विकसीत करण्यासाठी प्रोत्साहन देणार.

- पीपीपी तत्वावर देशात चार लॉजिस्टिक पार्क

- 60 किलोमीटरचे आठ रोपवे उभारणार

- शेतीतील आधुनिक करण्यावर भर, ड्रोनच्या वापरास बजेट मध्ये तरतूद...

- झिरो बजेट शेती, सेंद्रीय शेती आणि आधुनिक शेती यावरील अभ्यासक्रमांसाठी प्रोत्साहन देणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com