Union Budget 2023 : १४ हजार ४०० मिनिटं अधिकारी असतात 'नजरकैदेत'; अर्थसंकल्प कसा तयार होतो ? जाणून घ्या ..

Nirmala Sitaraman Union Budget 2023 : अर्थसंकल्पाचा अर्थ, अर्थसंकल्प किती प्रकार आहेत?
Nirmala Sitaraman  Union Budget 2023
Nirmala Sitaraman Union Budget 2023 sarkarnama
Published on
Updated on

Nirmala Sitaraman Union Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) आज (बुधवार) अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा बजेट सादर होत असताना अर्थसंकल्प म्हणजे काय, अर्थसंकल्पाचा अर्थ, अर्थसंकल्प किती प्रकार आहेत? असे अनेक प्रश्न पडत असतात. अर्थसंकल्प कसा तयार होतो, हे जाणून घ्या..

अनेकांना बजेट सादर होण्यापूर्वी काय स्वस्त झाले आणि काय महाग होईल याची उत्सुकता असते. हा केवळ अर्थसंकल्प नसून त्यात भांडवली बजेट आणि महसूल बजेट या दोन्हींचा समावेश होतो. आज ११ वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

देशात दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला जातो. नवीन आर्थिक वर्षासाठी तयार केलेल्या खात्यांमध्ये अनेक नवीन योजना आणि नियमांसह आगामी वर्षातील देशाचा खर्च आणि गुंतवणूक यांचा तपशील देण्यात येतो.

Nirmala Sitaraman  Union Budget 2023
Budget 2023 : यंदा अर्थसंकल्पात हे पहिल्यांदाच होतयं ; मोदींसह केंद्रीय मंत्री ५० शहरात..

देशाच्या अर्थसंकल्प तयार करण्यासाठी हजारों अधिकाऱ्यांची टीम कार्यरत असते. अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी विविध उद्योगांच्या संघटना, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून माहिती मागवली जाते. त्यानंतर बजेट तयार होत असते.

बजेटला अंतिम रुप देण्याच्या कालावधीत बजेट तयार करणारे अधिकारी १० दिवस घरी जात नाही. बजेट हा गोपनीय असल्यामुळे १० दिवस या अधिकाऱ्यांचा घर आणि जगापासून संपर्क तुटलेला असतो.

Nirmala Sitaraman  Union Budget 2023
Kasaba By-Election : कसब्याची निवडणूक होणार रंगतदार ; शिवसेनेपाठोपाठ मनसेही रिंगणात..

विश्वासू अधिकाऱ्यांनाच घरी जाण्याची परवानगी

या १० दिवसाची माहिती मिनिटांत स्पष्ट केली तर, १४ हजार ४०० मिनिट हे अधिकारी सरकारच्या 'नजरकैदेत' असतात. बजेट तयार होत असतानना अर्थमंत्र्यांचे विश्वासू अधिकाऱ्यांनाच घरी जाण्याची परवानगी असते.

काय असतो केंद्रीय अर्थसंकल्प ?

देशाच्या राज्यघटनेनुसार कलम 112 नुसार, एका वर्षासाठीचे केंद्रीय अर्थसंकल्प, ज्याला वार्षिक आर्थिक विवरण देखील म्हटले जाते, हे त्या विशिष्ट वर्षासाठी सरकारच्या अंदाजे प्राप्ती आणि खर्चाचे विवरण आहे. महसुली बजेटमध्ये सरकारच्या महसुली प्राप्ती आणि खर्चाचा समावेश असतो.

अर्थसंकल्प म्हणजे तुमच्या खर्चाचा समतोल

तुमचे पैसे कसे खर्च करायचे याचे नियोजन करण्याची प्रक्रिया म्हणजे बजेट. या खर्चाच्या योजनेलाअर्थसंकल्प (Budget) म्हणतात. ही खर्च योजना तयार केल्याने तुम्हाला अगोदरच ठरवता येते की तुम्हाला आवश्यक असलेल्या किंवा करू इच्छित असलेल्या गोष्टी करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे पैसे असतील.अर्थसंकल्प केवळ तुमच्या उत्पन्नाशी तुमच्या खर्चाचा समतोल साधतो, असाच अर्थसंकल्प सरकार देश चालवण्यासाठी सादर करते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com