Budget 2023 News : नारायण राणेंचं खातं मालामाल, तब्बल 'इतक्या' कोटींच्या निधीची तरतूद!

Budget 2023 News : सूक्ष्म उद्योगांना दोन हजार कोटींची कर्ज वितरीत करण्यात येईल.
Budget 2023 News : Narayan Rane :
Budget 2023 News : Narayan Rane :Sarkarnama

Narayan Rane : 'केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२३-२४ या वर्षातील अर्थसंकल्प जाहीर केला. यात शेती क्षेत्रापासून पर्यटनापर्यंत मोठमोठ्या घोषणांचा डोंगर उभा करण्यात आला. या अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतक्रिया येत आहेत. सत्ताधारी समर्थन करताना करताना दिसून येतात, तर विरोधक यावर टिका करत आहेत. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खात्याला भरघोस निधी या अर्थसंकल्पातून मिळाले आहे.

Budget 2023 News : Narayan Rane :
Budget 2023 News : हा अर्थसंकल्प म्हणजे 'चुनावी जुमला'च ; अजित पवार बरसले..

केंद्रीय लघू, सूक्ष्म, व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या खात्याला आजच्या अर्तसंकल्पातून भरघोस निधी मिळाला आहे. नारायण राणे यांच्या खात्याला तब्बल ९ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच या खात्याअंतर्गत विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे. उद्योग विश्वावर लक्ष केंद्रीत करत केंद्र सरकारकडून काही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आले आहे.

Budget 2023 News : Narayan Rane :
Raju Shetti News : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर राजू शेट्टी नाराज; म्हणाले...

केंद्र सरकारकडून लघु व मध्यम उद्योगांसाठी क्रेडीट रिव्हँप योजना 1 एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे. लघू आणि मध्यम उद्योगांसाठी तब्बल 9 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 2 लाख कोटींच्या मोफत क्रेडीट गँरंटी देखील करण्यात आली आहे. लघू आणि सूक्ष्म उद्योगांना दोन हजार कोटींची कर्ज वितरीत करण्यात येईल. पर्यटन स्थळी युनिटी मॉल उभारण्यात येणार आहे, त्यामुळे नारायण राणे यांच्या खात्याला भरघोस निधीची उपलब्धता झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com