Budget 2024 Updates : देशातील एक कोटी महिला 'लखपती दीदी' बनल्या; सीतारमण यांचा दावा!

Nirmala Sitharaman Speech : 'महागाई नियंत्रणात, लोकांचं उत्पन्न वाढलं..'
Nirmala Sitharaman Speech
Nirmala Sitharaman Speech Sarkarnama
Published on
Updated on

Interim Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024-25 या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आज सादर होत असलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री नागरिकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. मोदी सरकारच्या कार्यकाळात एक कोटी महिलांना लखपती बनवण्याचे उद्दीष्ट गाठले असल्याचेही, सीतारामण यांनी नमूद केले. (Budget 2024 News)

Nirmala Sitharaman Speech
Union Budget 2024 live : मोदी सरकारचा जबरदस्त कॉन्फिडन्स; टॅक्समध्ये कोणताही बदल नाही...

निर्मला सीतारमण म्हणाल्या, "देशातील एक कोटीहून अधिक महिला लखपती बनल्या आहेत. आता हे उद्दीष्ट एक कोटीवरुन देशातील तीन कोटी महिलांना लखपती बनवण्याचं आहे. तर एकूण 9 कोटी महिलांच्या आयुष्यात बदल झाले आहेत. यामुळे महिला सक्षमीकरणाचे महत्तवाचे पाऊल आम्ही टाकले आहे.

Nirmala Sitharaman Speech
India Budget 2024 : 'महागाई तितकीशी वाढली नाही, लोकांचे उत्पन्न वाढले'; सीतारमण यांचा दावा!

'भारत एक जागतिक महासत्ता म्हणून उदयास येत आहे. भारताबाबत बोलायचे झाले तर सरकारचे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत. लोकांचे उत्पन्न वाढले आहे. महागाई फारशी वाढलेली नाही. मोदी सरकारच्या कार्यकाळात जनता सक्षम झाली आहे. या सरकारमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला जात आहे. भारताचे आर्थिक क्षेत्र मजबूत होत आहे. लोकांसाठी संधी अधिक वाढवल्या जात आहेत, असेही सीतारमण म्हणाल्या.

Nirmala Sitharaman Speech
Narendra Modi Speech : दोन कोटी महिलांना लखपती बनवणार; नरेंद्र मोदींची नवी घोषणा!

"कोरोना साथ येऊनही भारत वेगाने प्रगती करत आहे. आपला युवक देशाच्या विकासावर बोलत आहे. देशातील जनतेने आमचे सरकारला साथ दिला आहे. मागील दहा 10 वर्षात अनेक विकासाचे कार्यक्रम राबविण्यात आले. गरिबासाठी घरासाठी घर असो, प्रत्येक घराला पाणी पोहचवणे असो, गरिबांचे बँक खाते उघडणे असो, आम्ही विक्रमी वेळेत प्रत्येक क्षेत्रात काम करत आहोत. देशातील 80 कोटी गरिब जनतेला आम्ही रेशन पोहोचवले, असेही सीतारमण म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com