Union Budget 2024 live : मोदी सरकारचा जबरदस्त कॉन्फिडन्स; टॅक्समध्ये कोणताही बदल नाही...

Modi Government : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचे आज अंतरिम बजेट, अर्थमंत्री निर्मला सीतारमण कोणत्या घोषणा करणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष... Union Budget 2024 live
Union Budget 2024 live
Union Budget 2024 liveSarkarnama

Union Budget 2024 live : निर्मला सीतारमण यांच्याकडून अंतरिम बजेट सादर करण्यात आले. लोकसभेत बजेटला मंजुरी.

Union Budget 2024 live : टॅक्स स्लॅबमध्ये काहीही बदल नाही. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष करात काहीच बदल नाही.

Union Budget 2024 live : नवीन करप्रणालीनुसार सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही.

Union Budget 2024 live : 2024 मध्ये वित्तीय तुटीचं लक्ष्य 5.1 टक्के.

Union Budget 2024 live : लोकसंख्या नियंत्रणासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.

Union Budget 2024 live : आयुष्यमान भारत योजना सर्व अंगणवाडी सेविका व आशा सेविकांना लागू.

Union Budget 2024 live : आयुष्यमान भारत योजना सर्व अंगणवाडी सेविका व आशा सेविकांना लागू.

Union Budget 2024 live : एक कोटी घरांमध्ये सौर ऊर्जा योजनेतून 300 युनिट वीज मोफत देणार.

Union Budget 2024 live : सौरऊर्जा योजनेसाठी राज्यांना 75 हजार कोटींचे कर्ज.

Union Budget 2024 live : तंत्रकुशल तरूणांना 50 वर्षांसाठी व्याजमुक्त कर्जासाठी 1 लाख कोटी.

Union Budget 2024 live : पर्यटनाला प्राधान्य दिले जाणार असून लक्षद्वीपच्या विकासावर भर दिला जाईल.

Union Budget 2024 live : पायाभूत सुविधांसाठी 11 लाख 11 हजार 111 कोटींची तरतूद.

Union Budget 2024 live : देशातील 40 हजार रेल्वे कोच वंदे भारत गाड्यांच्या दर्जाचे केले जातील.

Union Budget 2024 live : सध्याच्या विमानतळांचे विस्तारीकरण आणि नवीन निर्मितीचे काम वेगाने सुरू ठेवले जाईल.

Union Budget 2024 live : तीन रेल्वे कॉरडॉर निर्माण केेले जातील. पीएम गतिशक्ती योजनेअंतर्गत गती दिली जाईल.

Union Budget 2024 live : नॅनो युरियाच्या यशानंतर आता नॅनो डीएपीचा प्रयोग.

Union Budget 2024 live : पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेला प्रोत्साहन देणार.

Union Budget 2024 live : जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान या मार्गाने मोदी सरकार प्रयत्नशील.

Union Budget 2024 live : गर्भाशय कॅन्सर लसीकरणासाठी ९ ते १४ वयोगटातील मुलांना प्राधान्य.

Union Budget 2024 live : तेलबियांच्या बाबतीत देश आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

Union Budget 2024 live : सक्षम अंगणवाडी योजना पुढील काळात सुरू केले जाईल. मिशन इंद्रधनुष्य सुरू केले जाईल.

Union Budget 2024 live : अधिकाधिक मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा प्रयत्न. सध्या रुग्णालयांचाच त्यासाठी वापर करणार. एक कमिटी स्थापन केली जाईल.

Union Budget 2024 live : ग्रामीण भागात दोन कोटी घरे पुढील पाच वर्षांत बांधून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Union Budget 2024 live : देशाच्या आर्थिक विकासात सर्व देशवासियांचा सहभाग असून आर्थिक स्थिती भक्कम आहे.

Union Budget 2024 live : जीएसटीमुळे एक देश, एक बाजार आणि एक कर हे उद्दिष्ट साध्य झाले. कृषी समित्या, कृषी बाजार डिजिटली जोडल्या.

Union Budget 2024 live : मुद्रा योजनेतून महिलांना 34 कोटींचे कर्ज दिले. पीएम आवास योजनेतून ग्रामीण भागात 70 टक्के घरे महिलांना दिली.

Union Budget 2024 live : मुली, महिलांचा शिक्षण आणि कामातील वाढता सहभाग सकारात्मक आहे.

Union Budget 2024 live : 25 कोटी नागरिकांना दारिद्र्य रेषेतून बाहेर काढले. जनधन योजनेतून गरिबांना आधार दिला. 80 कोटी नागरिकांना मोफत रेशन दिले.

Union Budget 2024 live : राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे शिक्षणाला नवीन आयाम मिळाले आहेत. युवकांमध्ये कौशल्य निर्माण करण्यासाठी नवीन संस्था निर्माण केल्या जात आहेत. सात आयआयटी, 15 एम्स, 390 विद्यापीठे निर्माण केली.

Union Budget 2024 live : पीएम किसान सन्मान योजनेतून 11 कोटी 80 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळत आहेत. यांसह शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत.

Union Budget 2024 live : महिला, युवा आणि शेतकरी म्हणजे अन्नदाता त्यांच्या गरजा, अपेक्षांना सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. गरीब कल्याण, देशाचे कल्याण यावर आमचा विश्वास आहे.

Union Budget 2024 live : सर्वांगीण, सर्वस्पर्शी, सर्वसमावेश विकासासाठी सरकार कटिबध्द आहे. यापुर्वी सामाजिक न्याय केवळ राजकीय हेतूने प्रेरित होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार प्रत्यक्ष न्याय देत आहे.

Union Budget 2024 live : मागील दहा वर्षात प्रत्येकाला घर, प्रत्येक घरी पाणी अशा विविध योजना मागील दहा वर्षांत राबवल्या. 2014 मधील सगळी आव्हाने सरकारने पेलली.

Union Budget 2024 live : सबका साथ, सबका विकास हा आमचा मंत्र. गेल्या दहा वर्षात देशाचा सकारात्मक विकास.

Union Budget 2024 live : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अंतरिम बजेट सादर करण्यास सुरूवात...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com