BJP National President J.P. Nadda : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवण्यात आला आहे. 'भाजपच्या (BJP) राष्ट्रीय कार्यकारिणी समितीने निर्णय घेतला आहे की जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवण्यात आला. 2024 पर्यंच्या सर्व निवडणुका भाजप जे.पी. नड्डा यांच्याच नेतृत्त्वात लढणार, असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.
भाजपच्या कार्यकारिणीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हा प्रस्ताव मांडला आणि सर्वांनी एकमताने मंजुरी दिली. कोविड महामारीच्या काळात जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली बूथपासून राष्ट्रीय स्तरापर्यंत सेवा हीच संघटना, हा मंत्र जप त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी कोविड काळात जनतेची सेवा केली. असंही शहा यांनी सांगितलं.
2024 ची लोकसभा निवडणूकात भाजप जे.पी. नड्डा आणि पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करेल, यावर अमित शहा यांनी भर दिला. 2024मध्ये भाजप 2019 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वासही अमित शहा यांनी व्यक्त केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा पक्षाने प्रचंड बहुमताने विजय मिळवला, तेव्हा अमित शहा यांना केंद्रीय राजकारणात आणण्यात आले. त्यांना गृहमंत्री पद देण्यात आले. तर त्याचवेळी जे.पी. नड्डा यांना पक्षाध्यक्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला.
खास गोष्ट म्हणजे जे.पी. नड्डा हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जातात. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात संघटना मजबूत करण्याचे काम केले आहे. अनेक प्रसंगी एकत्र राहून त्यांनी पक्षाचे अनेक कार्यक्रम पुढे नेण्याचे काम केले. अशा स्थितीत त्या उत्तम समन्वयाच्या दृष्टीने 2024ची निवडणूक जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सज्ज झाली आहे. जे.पी. नड्डा यांनी त्या मोठ्या परीक्षेची रूपरेषा आधीच तयार केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.