Satyajeet Tambe यांच्या बंडखोरीला नाना पटोले जबाबदार, त्यांना पदावरून हटवा !

Nana Patole : या दोन्ही ठिकाणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळेच सर्व गोंधळ उडालेला आहे
Ashish Deshmukh and Nana Patole
Ashish Deshmukh and Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Election of Teachers and Graduate Constituencies Elections : राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत आहे, ते नाशिक (Nasik) पदवीधर आणि नागपूर (Nagpur) शिक्षक मतदारसंघ. या दोन्ही ठिकाणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळेच सर्व गोंधळ उडालेला आहे, असे म्हणत नाना पटोलेंना (Nana Patole) प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा, अशी मागणी कॉंग्रेसचे नेते, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केली आहे.

डॉ. देशमुख (Ashish Deshmukh) यांनी नवी दिल्ली येथे थेट राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भेटून तक्रार केली आहे. तसे पत्रही त्यांनी दिले आहे. पत्रात ते म्हणतात, आपल्या नेतृत्वात कॉंग्रेस (Congress) प्रगतीच्या अपेक्षेत आहे. एकेकाळी कॉंग्रेस देशाचा एक प्रमुख पक्ष होता. खरे म्हणजे, कॉंग्रेस हा नुसता राजकीय पक्ष नसून एक विचार आहे, एक चळवळ आहे. कॉंग्रेससारखी परंपरा इतर कोणत्याही पक्षात दिसत नाही. एक मोठा राजकीय पक्ष आज आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडतोय, अशी परिस्थिती मागील काही वर्षांपासून उत्पन्न झाली आहे.

आपला कॉंग्रेस पक्ष इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा मागे पडला आहे. आपला पक्ष महाराष्ट्रात सकारात्मक कार्य करताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. शेतकरी, कामगार, आदिवासी, युवा वर्ग, महिला, शोषित, पिडीत, वंचित, मागासवर्गीय यांचे प्रश्न व्यवस्थित हाताळण्यासाठी तसेच संघटनात्मक कार्य करून ओबीसी, महिलांवरील अत्याचार आणि जनहितार्थ मुद्यांवर मार्ग काढण्यासाठी फेब्रुवारी २०२१ मध्ये नाना पटोले यांना मोठ्या विश्वासाने कॉंग्रेस श्रेष्ठींनी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली.

पटोलेंनी तो विश्वास त्यांनी सपशेल फोल ठरवला. विदर्भ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. प्रदेशाध्यक्षांच्या कार्यशैलीमुळे हा बालेकिल्ला आता कॉंग्रेसच्या हातातून निसटला आहे. सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरीने कॉंग्रेसची नामुष्की झाली. यासाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले हेच जबाबदार आहेत. पटोलेंच्या कार्यकाळात पक्षाला सातत्याने नाचक्कीचा सामना करावा लागत आहे. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कॉंग्रेसची दाणादाण उडत आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कॉंग्रेस पुढच्या काळात महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष ठरेल यासाठी आम्ही कामकाज करू, असे पटोलेंनी ठासून सांगितले होते.

प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कॉंग्रेसची वाताहत सुरू झाली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये विधान परिषदेसाठी नागपूरच्या जागेवरून कॉंग्रेस उमेदवार रवींद्र भोयर होते. पण मतदानाच्या काही तास आधी नाट्यमय घडामोडी झाल्या, अचानक अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपच्या बावनकुळे यांचा मोठा विजय झाला. जून २०२२ मध्ये विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हांडोरे हे नंबर एकचे उमेदवार होते. पण भाई जगताप यांना जास्त मते मिळाली, त्यामुळे चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला. हांडोरे यांना निवडून आणण्याचे हायकमांडचे आदेश होते. तरीही या आदेशाच्या विरोधात निकाल लागला.

Ashish Deshmukh and Nana Patole
Nana Patole News : नाना पटोले बारामतीत अन् जिल्ह्यातील काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने घेतली फडणवीसांची भेट

४ जुलै २०२२ ला शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी परीक्षा होती. यावेळी विरोधकांची एकजूट महत्वाची होती. पण कॉंग्रेसचे तब्बल १० आमदार या बहुमत चाचणीत गैरहजर राहिले. यामुळे सरकारचे बहुमत मोठ्या प्रमाणात वाढले. पक्षादेश असतानासुद्धा अनेकांनी पक्षविरोधी काम केलं. या तीनही प्रकरणांची चौकशी करण्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले होते, त्यासाठी हायकमांडकडे अहवाल पाठवणार असल्याचे दावे त्यांनी केले. पण आजपर्यंत कोणावरही कारवाई झाली नाही किंवा कोणालाही जबाबदार ठरविण्यात आलेले नाही.

महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे भविष्य हे महाराष्ट्रातील लोकांच्या हातात आहे. कॉंग्रेसला निर्णायक भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यासाठी मजबूत नेते आणि कार्यकर्त्यांचं नेटवर्क तयार करावे लागणार आहे. नेते व कार्यकर्ते पुन्हा नक्कीच जुळतील. पण त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील शिर्षस्थ नेतृत्व आणि कार्यकर्त्यांमधील दुवा म्हणजेच महाराष्ट्र प्रदेशातील नेतृत्व हे सक्षम असणे गरजेचे आहे. म्हणूनच, महाराष्ट्रात कॉंग्रेसची स्थिती सुधारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचा अध्यक्ष तात्काल बदलण्याची नितांत गरज आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com