महाराष्ट्रासह राजस्थान, हिमाचलमध्ये काँग्रेस तर आसाम व मध्य प्रदेशात भाजपची आघाडी

देशातील तीन लोकसभा व 30 विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकांच्या निकालाची स्थिती
BJP, Congress
BJP, CongressFile Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : देशातील तीन लोकसभा (Lok Sabha Election) व 30 विधानसभेच्या (Assembly Election) जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांची (Bypoll) मतमोजणी सुरू आहे. ही निवडणूक 30 ऑक्टोबर रोजी झाली होती. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रासह राजस्थान व हिमाचल प्रदेशात काँग्रेसच्या उमेदवारांनी तर मध्य प्रदेश व आसाममध्ये भाजपने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. पश्चिम बंगालमधील चारही मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांनी विजयाच्या दिशेने आगेकूच सुरू ठेवली आहे.

महाराष्ट्रामध्ये देगलूर-बिलोली विधानसबा मतदारसंघात काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांनी आघाडी घेतली आहे. भाजपचे उमेदवार सुभाष साबणे पिछाडीवर आहेत. तर दादरा व नगर हवेलीमध्ये शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मोहन डेलकर यांच्या निधनानंतर याठिकाणी निवडणूक होत आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा सिंग आघाडीवर आहेत. मतमोजणी सुरू झाल्यानंतर काही काळ भाजपच्या उमेदवाराने आघाडी घेतली होती. प्रतिभा सिंग या माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्या पत्नी आहेत. भाजपकडून कारगील वॉर हिरो ब्रिगेडिअर (नि.) कौशल ठाकूर मैदानात आहेत. मध्य प्रदेशातील खांडवा लोकसभा मतदारसंघात भाजपेच ज्ञानेश्वार पाटील यांनी आघाडी घेतली आहे.

BJP, Congress
वानखेडेंची कबुली; होय, बहिणीकडे ड्रग्ज पेडलर गेला होता, पण...

हिमाचल प्रदेशातील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी दोन जागांवर काँग्रेसचे उमेदवार तर एका ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला आघाडी आहे. कर्नाटकमध्ये सिंदगी मतदारसंघात भाजप उमेदवाराने विजयी आघाडी घेतली आहे. तर हनगलमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराने भाजपला पिछाडीवर टाकले आहे. आंध्र प्रदेशातील एकमेव विधानसभा मतदारसंघात वायएसआर काँग्रेसने विजयाच्या दिशेने आगेकुच केली आहे.

मध्य प्रदेशातील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी दोन जागांवर भाजप तर एका जागेवर काँग्रेसची आघाडी आहे. रायगांव मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार पुढे आहे. तर जोबात व प्रित्वीपूर मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. राजस्थानमधील वल्लभनगर व धारीवाड मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे काँग्रेसच्या उमेदवारांनी भाजपला मागे टाकले आहे.

बिहारमधील कुशेश्वरस्थान मतदारसंघात जेडीयू तर तारापूरमध्ये आरजेडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. पश्चिम बंगालमधील दिनहाता, शांतीपूरसह चारही विधानसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर असून चारही ठिकाणी तेच विजयी होण्याची शक्यता मतमोजणीवरून दिसून येते. आसाममधील पाच मतदारसंघात भाजप आणि युनायटेड पिपल्स पार्टी लिबरल (UPPL) या मित्रपक्षाने आघाडी घेतली आहे. तेलंगणातील एका जागेवर भाजपची आघाडी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com