Karti Chidambaram : काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम विरोधात CBIने केला गुन्हा दाखल; जाणून घ्या, नेमकं प्रकरण?

CBI Files Case Against Karti Chidambaram : २०१८ मध्ये कार्ती चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली होती आणि नंतर त्यांचे वडील माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना सीबीआय आणि ईडी दोन्ही यंत्रणांनी अटक केली होती.
Karti Chidambaram
Karti Chidambaramsarkarnama
Published on
Updated on

Congress News: केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम आणि अन्य जणांविरोधात गुन्हा दाखल करून, तपास सरू केला आहे. कार्ती चिदंबरम विरोधात चिनी कामगारांना बेकायदेशीरपणे भारतीय व्हिसा मिळवून देणे आणि अ‍ॅडव्हांटेज स्ट्रॅटेजिक प्रायव्हेट लिमिटेडला १५,००० अमेरिकन डॉलर्स (१२.८८ लाख रुपये) लाच देणे या आरोपांची चौकशी सुरू आहे.

२०१८मध्ये सीबीआयने कार्ती , अ‍ॅडव्हांटेज स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड, एस भास्करारामन आणि अज्ञात जणांविरोधात FIPB म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्यूशनल प्रमोशन बोर्ड प्रकरणात प्राथमिक चौकशी सुरू केली आहे होती.

तपासात दिसून असे आढळून आले की, डियाजिओ स्कॉटलंड आणि सेक्वॉइया कॅपिटल्सने अ‍ॅडव्हांटेज स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या खात्यात गुप्तपणे निधी हस्तांतरीत केला होता. यानंतर आता नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Karti Chidambaram
Omar Abdullah News : ओमर अब्दुल्लांचं मोठं वक्तव्य!, म्हणाले ''...तर I.N.D.I.A आघाडी संपुष्टात आणली पाहिजे''

अ‍ॅडव्हांटेज स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड तीच कंपनी आहे, जी आयएनएक्स मीडिया केसमध्ये सीबीआय (CBI) आणि ईडीच्या रडारावर होती आणि याचसोबत या कंपनीचे नाव चिनी कामगारांना बेकायदेशीरपणे भारतीय व्हिसा मिळवून देण्यातही समोर आले होते.

Karti Chidambaram
Top Ten News : उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरे फडणवीसांशी जवळीक साधताय? ; बीडबाबत शरद पवारांचा मोठा निर्णय - वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

२०१८ मध्ये कार्ती चिदंबरम (Karti Chidambaram) यांना सीबीआयने अटक केली होती आणि नंतर वडील पी चिदंबरम यांना सीबीआय आणि ईडी दोन्ही यंत्रणांनी अटक केली होती. कार्ती चिदंबरम यांच्यावर सीबीआयाचा आरोप आहे की, डायगियो स्कॉटलँडने त्यांच्याशी संपर्क साधला होता आणि प्रतिबंध हटवण्यासाठी अ‍ॅडव्हांटेज स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडला १५ हजार अमेरिकी डॉलर दिले होते, जी कार्ती चिदंबरम आणि एस भास्कररमन नियंत्रित करतात. डिएगो स्कॉटलँड कंपनी भारतात जॉनी वॉकर आयात करण्याचं काम करते.

(Edited by -Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com